Ajay Devgn Dainik Gomantak
मनोरंजन

Ajay Devgn Viral Video : वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चाहत्याने असे काय केले की अजय देवगन संतापला...

अजय देवगनने आपल्या चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा करताना एका अतिउत्साही चाहत्याच्या कृतीने तो चांगलाच चिडला...

Rahul sadolikar

 Ajay Devgn Viral Video: अजय देवगणसाठी यावेळीचा वाढदिवस खूप खास होता . एकीकडे भोलाच्या कमाईत थोडीशी उडी होती, तर दुसरीकडे अभिनेत्याने त्याचा 54 वा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसोबत साजरा केला.

'सिंघम' अभिनेता अजय देवगणने रविवारी चाहत्यांमध्ये आपली उपस्थिती अनुभवली. मात्र याचदरम्यान एका चाहत्याने त्याच्यासोबत असं कृत्य केलं की, अजयच्या रागाचा पारा चढला

खरं तर, अजय देवगणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. तो घराबाहेर पडताच चाहत्यांनी त्याला घेरले. सर्व चाहते अजय देवगणसोबत फोटो क्लिक करण्यासाठी उत्सुक होते.

अजयने सर्वांसोबत सेल्फी काढले, पण त्याच दरम्यान एकाने असे काही केले की त्यामुळे अजय संतापला. खरंतर त्या चाहत्याने अजय देवगणचा हात धरला होता. त्याने एका हाताने अजयचा हात धरला आणि दुसऱ्या हाताने फोटो क्लिक करायला सुरुवात केली.

हे पाहून अजय देवगण संतापला. त्याने कसेतरी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आपले हात सोडवले, पण त्याच्या चेहऱ्यावर रागाचे भाव स्पष्ट दिसत होते.

अजय देवगणच्या भोलाने थिएटरमध्ये तीन दिवसांत जवळपास 30 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळत आहे. त्याचबरोबर 'भोला' नंतर अजय देवगणचा पुढचा चित्रपट 'मैदान' असणार आहे. 

त्याचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. बोनी कपूर यांच्या चित्रपटात अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो सय्यद अब्दुल रहीमची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT