Shaitaan Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Shaitaan: आर. माधवन अन् अजय देवगण यांचा 'शैतान' चित्रपट बॉक्स ऑफीसवर टिकणार का?काय सांगतात आकडे

Shaitaan: समीक्षकांनी चित्रपट समाधानकारक असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Shaitaan Movie Box Office collection prediction

बॉलीवूडचे दोन दिग्गज कलाकार आर. माधवन आणि अजय देवगण एकत्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मोठ्या पडद्यावर आले आहेत. 'शैतान' या चित्रपटातून ते चाहत्यांच्या भेटीसाठी हजर झाले आहे. आता महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर रिलिज झालेल्या शैतान चित्रपटावर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, हे जाणून घेऊयात.

शैतान हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. थिएटरमधील सकाळ आणि दुपारच्या शोमध्ये प्रेक्षकांनी सुमारे 20% जागा व्यापल्या आहेत, तर अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहिले तर चित्रपट पहिल्या दिवशी उत्तम कमाई करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

रिलीजपूर्वी 'शैतान'ने देशभरात अॅडव्हान्स बुकिंगमधून 4.14 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाच्या 1.76 लाखांहून अधिक तिकिटांचे आगाऊ बुकिंग झाले आहे. जे अपेक्षेपेक्षा खूपच चांगले आहे. ॲडव्हान्स बुकिंगचा ट्रेंड पाहता, अजय देवगण-माधवन स्टारर चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' पहिल्या दिवशी जवळपास कमाई करेल असे म्हटले जात आहे.  'ड्रीम गर्ल 2' ने पहिल्या दिवशी 10.69 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले होते.

चाहते या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. समीक्षकांनी चित्रपट समाधानकारक असल्याचे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, आर.माधवनच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. आता 60-65 कोटीच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT