Shaitaan Movie
Shaitaan Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Shaitaan Box Office Collection: अजय देवगण अन् आर. माधवनच्या जोडीने प्रेक्षकांना पाडली भूरळ; कमाईचे आकडे वाचून व्हाल थक्क

दैनिक गोमन्तक

Shaitaan Movie Box Office Collection

अजय देवगन आणि आर माधवनचा शैतान हा चित्रपट महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ८ मार्चला मोठ्या पडद्यावर आला आहे. महत्वाचे म्हणजे प्रेक्षक या चित्रपटाला मोठा प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. रिलिज झाल्याच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये मोठी गर्दी केली होती. चला तर जाणून घेऊयात शैतानने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफीसवर किती गल्ला जमवला आहे.

चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 1.76 लाखांहून अधिक तिकिटे विकून 4.14 कोटी रुपयांची कमाई केली होती. अशा परिस्थितीत हा चित्रपट पहिल्या दिवशी 10-12 कोटींहून अधिक कमाई करेल, अशी अपेक्षा होती. मात्र चित्रपटाने सगळ्यांचे अंदाज चुकवत 'शैतान'ने पहिल्या दिवशी देशात 14.20 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले आहे. तर जगभरात 21.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट हा अजय देवगणचा परदेशातील सर्वात मोठा रिलीज आहे. देशाबाहेर आणि परदेशात 1200 हून अधिक स्क्रीनवर तो प्रदर्शित झाला आहे. याचा फायदाही चित्रपटाला झाला आहे. याने पहिल्याच दिवशी परदेशात 5 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

विकास बहल दिग्दर्शित 'शैतान' हा एक हॉरर-थ्रिलर आहे. ट्रेलर लाँच झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत होती. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनी माधवन आणि जानकी बोडीवाला यांच्या अभिनयाचे कौतुक केले. त्याचा परिणाम कमाईवरही दिसून आला. शुक्रवारी मॉर्निंग शोमध्ये 'शैतान'साठी प्रेक्षक 14% जागांवर दिसले, तर रात्रीच्या शोमध्ये ही संख्या 43% पर्यंत वाढली.

दरम्यान, लॉकडाऊननंतर रिलीज झालेल्या अजय देवगणच्या चित्रपटांपैकी 'दृश्यम 2', 'रनवे 34', 'थँक गॉड' आणि 'भोला' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाहीत. आता शैतान त्याची कमतरता भरुन काढण्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत. 60-65 कोटी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आता बॉक्स ऑफीसवर नवीन रेकॉर्ड तयार करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

Goa Top News: कोलवा महिला मारहाण प्रकरण, कुठ्ठाळीत खून, मडगावात भाजपला गळती; गोव्यातील ठळक बातम्या

Goa: ड्रमर मित्राने दोन दिवस फोन उचलला नाही; दरवाजा उघडल्यावर जे दृष्य दिसलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले

Goa DGP जसपाल यांची 'दादागिरी' सुरुच, जाता - जाता पोलिस अधिकाऱ्यांवर सूडबुद्धीने कारवाया

Bicholim Road Potholes: भयानक अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करा; वाहनचालकांची मागणी

SCROLL FOR NEXT