Ajay Devagn Dainik Gomantak
मनोरंजन

Ajay Devagn : अजय देवगनच्या 'भोला'चा दुसरा टिझर रिलीज, चाहत्यांनी केलं कौतुक

अभिनेता अजय देवगनच्या भोला चित्रपटाचा दुसरा टिझर रिलीज झाला आहे.या टिझरचं चाहत्यांकडुन कौतुक होत आहे

Rahul sadolikar

अजय देवगनच्या बहुप्रतिक्षित 'भोला' या चित्रपटाचा दुसरा टीझर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये अभिनेता गाजराप्रमाणे शत्रूंना कापताना आणि जमिनीत गाडताना दिसत आहे. त्याचवेळी अनुपम खेर यांच्या आगामी 'शिव शास्त्री बलबोआ' या चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. यात अभिनेते बॉक्सर बनले आहेत.

जेव्हापासून अजय देवगनने त्याच्या 'भोला' चित्रपटाचा पहिला टीझर शेअर केला आहे, तेव्हापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पण हा उत्साह शिगेला पोहोचला जेव्हा अभिनेत्याने त्याचा दुसरा टीझर रिलीज करण्याची घोषणा केली.

 आता 'भोला'चा दुसरा टीझर रिलीज झाला आहे, जो नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आहे. चित्रपटाच्या पहिल्या टीझरमध्ये अजय देवगण वेगवान अॅक्शन आणि त्याच्या शत्रूंशी भिडताना दिसत आहे. या टीझरमध्ये तब्बू पोलिसाच्या भूमिकेतही दिसत आहे.

भोलाच्या दुसऱ्या टीझरची सुरुवातच अजय देवगनच्या दिसण्यापासुन होते. तो म्हणतो - ज्या बापाला 10 वर्षात एकही बाहुली देता आली नाही, तो एका रात्रीत जग देण्याच्या विचारात आहे. यानंतर, सीन कट होतो आणि तिथे सुरू होतो जिथं अजय देवगण राख लावलेल्या रुपात शत्रूंना चिरतो असे सीन आहेत. दुसरा टीझरही खूप दमदार असून चाहत्यांना तो प्रचंड आवडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT