Shahrukh Khan शाहरुखच्या पठाणने मोडला बाहुबलीचा रेकॉर्ड ..रिलीजच्या आधीच छप्परफाड कमाई

शाहरुख खानचा आगामी पठाण हा चित्रपट रिलीजच्या आधीच कमाईचे नवीन रेकॉर्ड बनवत आहे
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanDainik Gomantak
Published on
Updated on

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित पठाण रिलीज व्हायला फक्त काही तास शिल्लक आहेत. प्रचंड वाद होऊनही चित्रपटाच्या यशावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही, कारण चित्रपटाची कमाई बघता प्रेक्षकांना चित्रपटाच्या वादात काहीच रस नसल्याचे दिसुन आले आहे.

शाहरुखला मोठ्या पडद्यावर बघण्याची प्रेक्षकांची इच्छा आता काही तासांनी पू्र्ण होणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट पडद्यावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने मागील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

सोमवारी रात्रीपर्यंत देशभरात 'पठाण'च्या 8.05 लाखांहून अधिक तिकिटांचे पहिल्या दिवसासाठी अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. 

तर पहिल्या वीकेंडसाठी आतापर्यंत १० लाखांहून अधिक तिकिटे बुक झाली आहेत. त्यापैकी 7.68 लाखांहून अधिक तिकिटे फक्त हिंदीसाठी विकली गेली आहेत. 

या जबरदस्त कमाईने 'पठाण'ने यासह 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्याच दिवशी प्रभासच्या 'बाहुबली 2' च्या हिंदी आवृत्तीसाठी 6.50 लाख तिकिटांची अॅडव्हान्स बुकिंग करण्यात आली होती. 

बुधवार, 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'पठाण'ने अशा प्रकारे अॅडव्हान्स बुकिंग करून इतिहास रचला आहे.

Shah Rukh Khan
Fukray 3 : एक्सेल एंटरटेनमेंटने 'फुकरे 3'च्या रिलीजची केली घोषणा, 7 सप्टेंबर 2023 रोजी होणार रिलीज

सिनेमाच्या बिझनेसची माहिती देणार्‍या वेबसाइट सॅकनिल्कच्या अहवालानुसार, सोमवारी रात्री 11.30 वाजेपर्यंत 'पठाण'च्या पहिल्या दिवसाच्या शोसाठी 805,915 तिकिटांची आगाऊ बुकिंग झाली आहे. त्यापैकी हिंदी आवृत्तीमध्ये सर्वाधिक 768,959 तिकिटांची विक्री झाली आहे.

 तेलगूमध्ये 31,195 तिकिटांचे आगाऊ बुकिंग झाले आहे. तमिळ आवृत्तीसाठी आगाऊ बुकिंगही सोमवारपासून सुरू झाले असून पहिल्याच दिवशी 5,761 तिकिटे आधीच बुक झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Political Reservation
Student Protest Police Lathicharge
Salman Khan Goa project news
Amit Shah, BL Santosh Goa visit
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com