Bollywood actress Aishwarya Rai Dainik Gomantak
मनोरंजन

ऐश्वर्या रायच्या 'पोन्नीयन सेल्वन' चित्रपटचा लूक आला समोर; पाहा फोटो

ती सध्या मणिरत्नमच्या 'पोन्नीयन सेल्वान' (Ponniyin Selvan) या चित्रपटावर काम करत आहे, ज्याचे चित्रीकरण मध्य प्रदेशातील ओरछा येथे होत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सध्या आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती सध्या मणिरत्नमच्या 'पोन्नीयन सेल्वान' (Ponniyin Selvan) या चित्रपटावर काम करत आहे, ज्याचे चित्रीकरण मध्य प्रदेशातील ओरछा येथे होत आहे. त्याचवेळी सेटवरून काही फोटो लीक झाली आहेत ज्यात ऐश्वर्या खूप सुंदर दिसत आहे. या फोटोत, पाहिले जाऊ शकते की तिने मांग टिका, हार आणि कानातले असलेली कांजीवरम साडी परिधान केली आहे तसेच ती इतर जड दागिन्यांनी भरलेली आहे. अभिनेत्रीचा हा नवीन अवतार लोकांना आकर्षित करत आहे.

या पात्रामध्ये दिसणार ऐश्वर्या

या चित्रपटाच्या सेटवर अभिनेते प्रकाश राज, तृषा कृष्णन आधीच उपस्थित होते. याशिवाय जयम रवी, कार्ती, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलीपाला या चित्रपटात दिसणार आहेत. शूटिंगच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री आपली मुलगी आराध्यासोबत दिसली. या चित्रपटात ऐश्वर्या नंदानी आणि मंदाकिनी देवीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी, आता या सेटवरून तिचे एक फोटो लीक झाले आहे. याबद्दल लोकांच्या सतत प्रतिक्रिया येत आहेत.

हा चित्रपट दोन भागांमध्ये होणार प्रदर्शित

हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे. ज्याचा पहिला भाग दोन भागांमध्ये 2022 मध्ये रिलीज होईल. अलीकडेच अभिनेत्रीने एक पोस्टर शेअर केले ज्यावर PS-1 लिहिलेले होते.

ऐश्वर्या रायच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच तामिळ चित्रपट पोन्नीयन सेल्वानमध्ये दिसणार आहे. तसेच ती अनुराग कश्यपच्या 'गुलाब जामुन' मध्ये दिसू शकते. अभिनेत्री शेवटची 'फन्ने खान' चित्रपटात दिसली होती. ऐश्वर्या राय बॉलिवूडमध्ये देवदास, रावण आणि जोधा अकबर सारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

SCROLL FOR NEXT