AI Used for VFX Dainik Gomantak
मनोरंजन

AI Used for VFX: चित्रपट चालणार की नाही हे आधीच सांगणार एआय

Artificial Intelligence: बॉलीवूडमध्ये हे प्रमाण कमी असले तरीही हॉलीवूडमध्ये याचा वापर आधीपासून होत असल्याचे पाहायला मिळते.

दैनिक गोमन्तक

Artificial Intelligence: एआयचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. मानवी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात आता एआयचा प्रभाव वाढताना दिसताना आहे. आता चित्रपटसृष्टीतदेखील एआय आपली जादू दाखवताना दिसणार आहे.

एआय आता एक पाऊल पुढे टाकत ऐतिहासिक डाटा, बॉक्स ऑफीसचा ट्रेंड इतकेच नाही तर एखादा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल की नाही किंवा चालेल की नाही याची शक्यतादेखील एआय सांगत असल्याचे म्हटले जात आहे.

जॉनर, कलाकार, दिग्दर्शक, मार्केटिंग, रिलीज डेट आणि स्पर्धा पाहता या चित्रपटाची बॉक्‍स ऑफिसवरची कामगिरी आतापासूनच समजू लागली आहे. यामुळे चित्रपटाचे बजेट आणि संबंधित नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करण्यास मदत होत आहे. या माहीतीवरुन एआय चित्रपट हिट ठरेल की फ्लॉफ याची शक्यता वर्तवू शकते.

अलीकडे चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर वाढताना दिसत आहे. बॉलीवूडमध्ये हे प्रमाण कमी असले तरीही हॉलीवूडमध्ये याचा वापर आधीपासून होत असल्याचे पाहायला मिळते. आता बॉलीवूडमध्येदेखील व्हीएफएक्स वापरुन चित्रपटात प्रयोग होताना दिसत आहेत.

नुकताच प्रदर्शित झालेला आदिपुरुषमधील व्हीएफएक्स सुमार दर्जाचे असल्याने चित्रपटावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे किती महत्वाचे आहे हे दिसून येते.

हॉलीवूडमध्ये एआयचा वापर करुन चित्रपटात व्हीएफएक्स वापरले जात आहे. मॉन्सटर्स एलियंस रोबोट्‌स जॉम्बीस (मार्झ) ही व्हीएफएक्‍स कंपनी एआयचा वापर करुन हॉलीवूडचे चित्रपटात व्हीएफएक्स तयार करत आहे. त्यांचे व्हॅनिटी नावाचे एआय टूल स्वस्त असून पारंपरिक व्हीएफएक्‍सपेक्षा 300 पट वेगाने व्हीएफएक्‍स तयार करते. त्यामुळे चित्रपटनिर्मात्यांचा फायदा होताना दिसत आहे. यामुळे आता बॉलीवूडमध्येदेखील एआयचा वापर करुन व्हीएफएक्सची निर्मिती होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Teachers' Day History: भारतात शिक्षक दिनासाठी 5 सप्टेंबरच का निवडला? डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाशी जोडलेला 'तो' किस्सा जाणून घ्या

Rashi Bhavishya 05 September 2025: आरोग्याकडे लक्ष द्या, वाद टाळा; शिक्षण व करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

Hockey Asia Cup 2025: आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, मलेशियाचा 4-1 नं केला पराभव

Dharbandora Accident: धारबांदोड्यात दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जखमी

GST 2.0: दूध, औषधं, शालेय साहित्य, विमा... 'या' सेवा आणि वस्तूंवर आता 0% जीएसटी, पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT