Shehnaz gill in badrinath Dainik Gomantak
मनोरंजन

कुडकुडत्या थंडीत शेहनाज गिलने घेतले बद्रीनाथचे दर्शन....व्हायरल फोटो

शेहनाज गिल सध्या भक्तीत रमलेली दिसत आहे, शेहनाजने सोशल मिडीयावर बद्रीनाथ इथले काही फोटो शेअर केले आहेत.

Rahul sadolikar

Shehnaz gill in badrinath : शहनाज गिल सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. सध्या अभिनेत्री तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. यादरम्यान अभिनेत्री बद्रीनाथच्या दर्शनासाठी आली होती. 

बद्रीनाथला भेट दिल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले ज्यामध्ये ती भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली. शहनाजने हे फोटो शेअर करताच चाहते सतत कमेंट करत आहेत.

शेहनाजने फोटो केले शेअर

ब्रदीनाथ मंदिरासमोर उभे असताना शहनाज गिलने इंस्टाग्रामवर अनेक फोटो क्लिक केले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला समजले असेल की तेथे प्रचंड थंडी आहे. 

फोटोमध्ये अभिनेत्रीने निळ्या रंगाचे जाकीट, डोक्यावर टोपी आणि गळ्यात लोकरीचा स्कार्फ घातलेला दिसत होता. या फोटोंमध्ये शहनाज कॅमेऱ्यासमोर हसताना आणि देवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली.

शेहनाजने स्वत: फोटो केले शेअर

शहनाज गिलने स्वत: तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताच काही वेळातच ते व्हायरल झाले.

शहनाजने अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडिओंमध्ये अभिनेत्री चमोलीत खूप एन्जॉय करताना दिसली. व्हिडिओमध्ये अभिनेत्री कधी नाचताना, कधी धावताना तर कधी हसताना किलर पोज देताना दिसत आहे.

शेहनाजचा शेवटचा चित्रपट

शेहनाज शेवटची 'थँक्स फॉर कमिंग  या चित्रपटात दिसली होती. शहनाजशिवाय भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत होती. चित्रपटात मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट बोल्ड होता. 

याबाबत बरीच चर्चा झाली. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही या चित्रपटातील सर्व सौंदर्यवती बोल्ड आणि खुलून दिसणारे कपडे परिधान करताना दिसल्या. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच चित्रपटाला खूप ट्रोल करण्यात आले.

ED Raid Casinos: पणजी, कळंगुट येथील 7 कॅसिनोंवर ईडीचे छापे, कर्नाटकातही 30 जागांवर कारवाई

FDA Raid: ‘एफडीए’ ॲक्शन मोडवर! 2460 किलो चिकन, 500 किलो पनीर, 10 किलो खवा जप्त

Bicholim Water Crisis: मुसळधार पावसात नळ मात्र कोरडेच! चतुर्थी’च्या तोंडावर डिचोलीत पाणीसंकट; पडोसे प्रकल्पात तांत्रिक बिघाड

Vishwajit Rane: 'मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीमागे मी धावत नाही'! राणेंचे स्पष्टीकरण; मोदींचे नेतृत्व बघून भाजपमध्ये प्रवेश केल्याचा खुलासा

Goa Politics: खरी कुजबुज; सरकारवर भरोसा नाय बा!

SCROLL FOR NEXT