Sudheer Varma Dainik Gomantak
मनोरंजन

Sudheer Varma Suicide: तुनिषानंतर टॉलिवूड स्टार सुधीर वर्माने केली आत्महत्या! 9 वर्षांपूर्वी...

Sudheer Varma Suicide: टॉलिवूड अभिनेता सुधीर वर्मा याने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे, मात्र मृत्यूचे कारण अद्याप कोणालाच कळू शकलेले नाही.

दैनिक गोमन्तक

Sudheer Varma Suicide: आपले जीवन संपवणे इतके सोपे नाही. अनेक वेळा माणूस आतून इतका तुटतो की, त्याच्या हातात काहीच राहत नाही. नुकतीच टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली. यातच आता आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या करुन जीवन संपवल्याची बातमी समोर आली आहे.

टॉलिवूड अभिनेता सुधीर वर्मा याने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे, मात्र मृत्यूचे कारण अद्याप कोणालाच कळू शकलेले नाही.

विशाखापट्टणम येथील राहत्या घरी आत्महत्या केली

मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर वर्माने विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूची पुष्टी करताना, त्याच्या सह-अभिनेत्याने लिहिले – 'खूप चांगला व्यक्ती… तुझ्यासोबत काम करुन छान वाटले.

विश्वास बसत नाही की तू आता या जगात नाहीस.' मात्र, त्याने असे पाऊल का उचलले, याचा तपास सुरु आहे. काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, त्या दबावाचे किंवा तणावाचे कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

2013 मध्ये पदार्पण केले

सुधीर वर्माच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, 2013 मध्ये त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव 'स्वामी रा रा.' होते. परंतु 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'कुंदनापू बोम्मा' मधून त्याला खरी ओळख मिळाली. या चित्रपटाने (Movie) त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. पण असे असतानाही एवढ्या वर्षांत त्याची कारकीर्द संथगतीने चालली होती.

रिपोर्ट्सनुसार, त्याला चांगल्या ऑफर्सही मिळत नव्हत्या. त्यामुळे तो तणावाखाली असण्याची शक्यता आहे. मात्र आत्महत्येचे खरे कारण काय, हे तपासानंतरच कळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Weather Update: धारबांदोडा, वाळपई, सांगेत पावसाची नव्‍वदी पार; सरासरीतील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकच

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, थकबाकीची रक्कमही मिळणार

Trigrahi Yog 2026: 22 ऑगस्टला बनतोय सर्वात शक्तिशाली 'त्रिग्रही योग'! 4 राशींच्या पदरात पडणार श्रीमंती अन् यश; भाग्योदयाचे दिवस सुरु होणार

Margao Police Station: झुरळे-डासांनीच सरकारला जाग! पोलिस ठाण्याच्या स्थितीवर प्रभव यांची सडकून टीका

SCROLL FOR NEXT