Kamlesh Uncle  Dainik Gomantak
मनोरंजन

राणू मंडलनंतर ट्रक ड्रायव्हरचं गाणं झालं व्हायरल, यूजर्स म्हणाले, ''हीच खरी प्रतिभा''

सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

दैनिक गोमन्तक

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काहीवेळा लोक काही निरुपयोगी व्हिडिओ देखील सोशल मीडियावर कोणत्याही अर्थाशिवाय व्हायरल करतात. मात्र या सगळ्यात खरी प्रतिभा कुठेतरी हरवलेली दिसते. अलीकडे राणू मंडल (Ranu Mondal) खूप चर्चेत होत्या. आता एका ट्रक ड्रायव्हरच्या गाण्यानं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत, ज्यामध्ये एक काका मोहम्मद रफीचे गाणे गाताना दिसत आहेत. (After Ranu Mondal now the truck driver's song has gone viral on social media)

दरम्यान, हा व्हिडिओ विवेक वर्मा नावाच्या इन्स्टा हँडलवर शेअर करण्यात आला आहे. विवेक स्वतः एक गायक आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करताना त्याने दिलेले कॅप्शन नक्कीच तुमच्या मनाला भावेल. हा व्हिडिओ शेअर करताना तो लिहितो की, 'कमलेश काकांनी आपले संपूर्ण आयुष्य ट्रक चालवण्यात घालवले असेल, पण ते मनापासून मोहम्मद रफींचे गाणे गात आहेत.' विवेक पुढे सांगतो की, ''कमलेश काकांनी रफींचे गाणं गुणगुणलं. मला काकांचे गायन खूप आवडलं आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ आपल्या सर्वांसोबत शेअर करत आहे. जर राणू मंडलप्रमाणे काकांनाही संधी मिळाली तर ते लवकरच आपलं स्व:ताचं एक गाणं रेकॉर्ड करतील.''

तसेच, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, 'ड्रायव्हर कमलेश मोहम्मद रफीचे (Mohammed Rafi) प्रसिद्ध गाणे 'मुझे इश्क है तुझी से' कसे गात आहे. या वयात त्यांची आवड पाहून लोक चकित झाले आहेत.' त्यांच्या गायकीचे कौतुक केलं जात आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजर्सने लिहिले की, "जेव्हा मी काकांनी गाताना ऐकले तेव्हा मला खूप आनंद झाला. किती सुंदर आवाज आहे". अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. त्यांचे गाणे तुम्हाला आवडले? आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT