Salman Khan Bulletproof Car Dainik Gomantak
मनोरंजन

Salman Khan Gun License मिळाल्यानंतर भाईजानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार

Salman Bulletproof Car: बॉलिवूडच्या दबंग खान म्हणजेच सलमान खानला धमक्या मिळाल्यानंतर, त्याने स्वतःसाठी एक नवीन बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे.

दैनिक गोमन्तक

अलीकडेच सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे खान कुटुंबाला धक्का बसला आहे. सलमान खानला (Salman Khan) अलुकडेच बंदूक बाळगण्याचा परवाना मिळाला आहे. त्याच्या कुटुंबीयांना लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्याचे कॉल आल्यानंतर सुपरस्टारने मदतीसाठी मुंबई पोलिसांकडे संपर्क साधला, ज्यामुळे त्याला बंदुकीचा परवाना मिळाला आणि आता बातम्या येत आहेत. असे म्हटले जाते की त्याची सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी एक नवीन बुलेटप्रूफ (Bulletproof Car) कार देखील खरेदी केली आहे.

* सलमानची बुलेटप्रूफ कार

अलीकडेच विमानतळ भेटीदरम्यान सलमान खान (Salman Khan) नवीन टोयोटा लँड क्रूझर कारमध्ये येताना दिसला होता. या कारची किंमत सुमारे 1.50 कोटी रुपये असल्याचे मानले जाते, ही कार पूर्णपणे बुलेटप्रूफ असण्याची शक्यता आहे. सुपरस्टार सलमान विमानतळावर येताच त्याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला. कारण तो यावेळी त्याच्या नवीन कारमधून विमानतळावर पोहोचला होता. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमानच्या सुरक्षेसाठी त्याच्यासोबत सुरक्षा कर्मचाऱ्यांची गर्दी होती. व्हिडिओमध्ये सलमान खानही खूप गंभीर दिसत होता.

* जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या

काही काळापूर्वी कथित लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ही धमकी मिळाल्यानंतर, त्याने 22 जुलै रोजी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. स्वसंरक्षणासाठी शस्त्र ठेवण्याचा परवाना मागितला. परवाना मिळाल्यानंतर सलमानने त्याच्या सुरक्षा व्यवस्थेतही अनेक बदल केले आहेत.

त्याचा आगामी चित्रपट 'भाईजान' आहे. या चित्रपटात (Movie) त्याच्या विरुद्ध पूजा हेगडे पहिल्यांदाच दिसणार आहे. या चित्रपटातून शहनाज गिलही बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करत आहे. सलमान खानचा हा चित्रपट यावर्षी 30 डिसेंबरला रिलीज होणार आहे. याशिवाय सलमानचा 'टायगर 3' देखील पाइपलाइनमध्ये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा! डॉल्बी ऑडिओमधील तांत्रिक बिघाडानं उडाली खळबळ; केंद्र सरकारकडून नवीन चेतावणी जारी

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

Bangladesh Violence: पेट्रोलचे 5 हजार मागितले अन् हिंदू तरुणाला कारखाली चिरडले, BNP नेत्यानं घेतला जीव; बांगलादेशात पुन्हा रक्ताची होळी

म्हादई अभयारण्यात कोत्राच्या नदीपात्रातून, पाच-सहा किमी डोंगर दऱ्या पार करून 'सिद्धेश्‍वराच्या गुंफे'कडे पोहोचता येते..

SCROLL FOR NEXT