Aditya Narayan and Shweta Agrawal Twitter
मनोरंजन

Indian Idol होस्ट आदित्य नारायण बनणार बाबा ?

आदित्य नारायणने (Aditya Narayan) नुकतेच होस्टिंगपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) मधील गायक (Singer) आणि होस्ट (Host) आदित्य नारायण (Aditya Narayan) आणि श्वेता अग्रवाल (Shweta Agrawal) यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झाले. दोघे बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आदित्य नारायणने नुकतेच होस्टिंगपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. यासह, त्याने आपल्या मुलाखतीत एक इशारा देखील दिला आहे की तो वडील होणार आहे. (Aditya Narayan is going to become father? Hint given to fans like this)

मीडियाच्या माहितीनुसार दिलेल्या आदित्यने म्हटले आहे की, पुढच्या वर्षी मी टीव्हीवर ब्रेक घेणार आहे. मी खूप आभारी आहे की मला एकाच वेळी बर्‍याच गोष्टी करण्याची संधी मिळाली पण ती दमछाक करणारी आहे. मी गेल्या 15 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे,आता दुसर्‍या गोष्टीकडे जाण्याची वेळ आली आहे.

लवकरच बाबा होऊ शकतो

आदित्य पुढे म्हणाला छोट्या पडद्यावर होस्टिंग करण्यास सुरूवात केली होती तेव्हा मी किशोरवयीन होतो, पुढील वर्षापर्यंत मी हे काम सोडणार आहे. मी लवकरच एक वडील होईल. या इंडस्ट्रीने मला नाव, पैसा आणि यश दिले आहे.

आदित्य नारायण इंडियन आयडलच्या होस्टिंगसाठी ओळखला जातो. श्वेता आणि आदित्यने गेल्या वर्षी लग्न केले आणि नंतर ते दोघे त्यांच्या हनिमूनसाठी काश्मीरला गेले. एका मुलाखतीत आदित्यने सांगितले होते की माझ्यासाठी खूप कठीण होते की गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे श्वेताला मी भेटू शकलो नाही, ती माझ्या घराच्या अगदी जवळ राहायची.

कोविडमुळे (Covid-19) आमचे लग्न लवकर झाले कारण गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे आमच्यात भांडण खूप कमी होत होते, आणि मी तिला खूप मिस करायचो. मग मी विचार केला की आता आपण भेटण्यासाठी भांडण करणार नाही आणि आम्ही लग्न केले.

आदित्य सध्या इंडियन आयडल 12 चे होस्ट करताना दिसत आहे. पुढच्या महिन्यात हा शो संपणार आहे. इंडियन आयडॉलचा फिनाले खूप प्रेक्षणीय होणार आहे. चाहते उत्सुकतेने त्याची वाट पाहत आहेत. अहवालानुसार हा फिनाले 12 तास चालेल. अद्याप याची खातरजमा झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'ब्रिटिशांच्या पक्षाने देशभक्ती शिकवू नये!', BJYM अध्यक्षांनी काँग्रेसला सुनावलं; Watch Video

Goa Rain: मान्सून म्हणतोय,"राम राम"! गोव्यात पावसाचा जोर घटला; ऑक्टोबर हीटची चाहूल

Charter Flight: पर्यटन हंगामाची दणक्यात सुरुवात! रशियातून पहिले चार्टर विमान मोपा विमानतळावर दाखल; गोव्याचे पारंपरिक आदरातिथ्य

Bethora Road Issue: बेतोड्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय

Goa Politics: खरी कुजबुज, मायकल जागे झाले!

SCROLL FOR NEXT