Aaditya Chopra Karan Johar Dainik Gomantak
मनोरंजन

Aditya- Karan Conflict : शाहरूख- राणीच्या त्या इंटिमेट सीनमुळं आदित्य चोप्रा आणि करण जोहरमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं

अभिनेता शाहरुख खान आणि राणी मुखर्जीच्या एका सीनमुळे आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यात वाद झाले होते

Rahul sadolikar

Aditya- Karan Conflict Because of Intimate scene beetwin Shahrukh -Rani 2006 मध्ये करण जोहर दिग्दर्शित 'कभी अलविदा ना कहना' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

या मल्टीस्टारर चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी, प्रिती झिंटा, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन आणि किरण खेर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. त्याची निर्मिती हिरू यश जोहरने केली होती, जी बॉक्स ऑफिसवर हिटही ठरली.

हा चित्रपट रोमँटिक जॉनरचा होता. यामध्ये अनेक इंटिमेट सीन्सही शूट करण्यात आले होते, या सीन्सना आदित्य चोप्राने खूप विरोध केला होता.

याबद्दल त्याचं करण जोहरशी बोलणंही झालं होतं. पण करण जोहर काही कमी जिद्दी नव्हता. करणने त्यांचं ऐकले नाही.आणि त्याला हवे असणारे सीन्स शूट केले.

कभी अलविदा ना कहना बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरला. यामध्ये शाहरुख खान आणि प्रिती झिंटा, राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांची जोडी असली तरी शाहरुख आणि राणी प्रेमात पडतात. ते दोघे एकमेकांना भेटू लागतात. 

ते त्यांच्या पार्टनर्सची फसवणूक देखील करतात. अशा स्थितीत त्यांच्यामध्ये काही इंटिमेट सीन्स देखील आहेत. दोघांमध्ये होणारे इंटिमेट सीन्स हेच आदित्य चोप्रा आणि करन जोहरच्या वादाचं कारण होतं.

आता चित्रपटाचे डिस्ट्रिब्यूटर्स आणि YRF चे प्रमुख आदित्य चोप्रा या सगळ्याच्या विरोधात होते. भारतीय प्रेक्षकांना हे सर्व आवडणार नाही, असे ते म्हणाले. हे चुकीचे आहे. मात्र, करण जोहरचे मत वेगळे होते. या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

करण जोहरने एका मुलाखतीत हे सांगितले आहे. 'मी त्या सीक्वेन्सचे शूटिंग करत होतो, मी बर्फाने झाकलेल्या एका मोठ्या लोकेशनवर उपस्थित होतो. मग आदिने मला फोन केला. तो म्हणाला-

"ऐक, मी गेल्या काही दिवसांपासून या गोष्टीचा विचार करत आहे आणि माझ्या मनात ही गोष्ट वारंवार येत आहे की आपण हा इंटिमेट सीन शूट करू नये. मला वाटते भारतातील लोक ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे याबाबत पुन्हा विचार करून हा सीन हटवावा".

या बोलण्यानंतरही करण ही गोष्ट ऐकायला तयार नव्हता . त्याने आदित्य चोप्राचे बोलणेच नाकारले . तो म्हणाला, 'मी सांगितलं की मी हे शूट करणार . हे कसे शक्य आहे की आपण रिलेशनशीपमध्ये असू शकता आणि आपल्याकडे कधीही XXX नाही? 

त्यामुळे फोनवर आमची मोठी भांडणे झाली. मी अडकलो होतो. पण, खूप नंतर जेव्हा मी याबद्दल विचार केला तेव्हा मला आढळले की तो बरोबर होता. या दोन्ही पात्रांनी चित्रपटातील शारीरिक संबंध पुढे केले नसते तर या लव्हस्टोरीला आपल्या देशात खूप प्रेम मिळालं असतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT