Amit Shah- Prabhas  Dainik Gomantak
मनोरंजन

Adipurush: आदिपुरुषवर केस दाखल होणार? AICWA ची अमित शहांकडे मोठी मागणी

Adipurush: देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मुंबई पोलिसांना एक पत्र लिहले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Adipurush: ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष रिलिज झाल्यापासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रेक्षकांनी चित्रपटातील संवाद आणि सुमार दर्जाचे व्हीएफएक्स यामुळे चित्रपटावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चित्रपटाने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने काही संघटनानी आदिपुरुषवर बंदी घालावी अशी मागणी केली होती.

आदिपुरष रिलिजझाल्यानंतर हिंदू संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेत चित्रपटाने हिंदू देवतांचा अपमान केल्याचे म्हणत चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी केली होती.

आता मात्र या वादाने मोठे स्वरुप धारण केले आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन ( AICWA )ने देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मुंबई पोलिसांना एक पत्र लिहले आहे. या पत्राद्वारे त्यांनी डायरेक्टर ओम राऊत, लेखक मनोज मुतंशिर आणि प्रोड्यूसर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.

Adipurush

आदिपुरुषमध्ये ज्याप्रकारे गोष्ट दाखवली गेली आहे, संवाद आहेत त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. यादरम्यानच काही हिंदू संघटनांनी पटियालामध्ये आदिपुरुष ला विरोध करण्यासाठी मोठे प्रदर्शन केले आहे.

  • अमित शहांना पत्र

असोशिएशन गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून आदिपुरुषने हिंदू धर्मियांच्या भावभावनांना दुखावल्याचे म्हटले आहे. पुढे असे म्हटले आहेकी, आदिपुरुषमध्ये संपूर्ण रामायण आणि रामाचे चरित्र दाखवले गेले आहे.

निर्माते मल्टीफ्लेक्स मध्ये कमी किमतीत तिकिटे विकून जास्त पैसे कमावण्यचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामुळे रामायण आणि आमच्या आस्थेबाबत चूकीचा संदेश दिला जाऊ शकतो. चित्रपटाचे प्रोड्यूसर टी-सीरीज, दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुतंशीर यांनी रामायणामध्ये बदल करुन रामायणाची थट्टा केली आहे. याचा कोणत्याही पद्धतीने स्विकार केला जाऊ शकत नाही. त्यामुळे आदिपुरुषचे मेकर्स, प्रोड्यूसर आणि लेखक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली जावी अशी मागणी असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे.

या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन यांसारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्याविषयी देखील प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून सुरुवातीच्या मोठ्या बंपर ओपनिंगनंतर आता आदिपुरुषला थंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दरम्यान, चित्ररपट रिलिज झाल्यानंतर पहिल्या नऊ दिवसात 268.55 कोटींची कमाई करणाऱ्या आदिपुरुषने शनिवारी 5.25 कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आदिपुरषला पुढे कसा प्रतिसाद मिळणार याबरोबरच अमित शहा असोसिएशन केलेल्या मागणीवर काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT