Sushmita Sen Suffers Heart Attack Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेत्री Sushmita Senला हृदयविकाराचा झटका

वेळेवर मदत करणाऱ्यांचे सोशल मीडिया पोस्टमधून मानले आभार

Akshay Nirmale

Sushmita Sen Suffers Heart Attack : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हीला हृदयविकाराचा झटका आला आहे. सुष्मिता सेन हीने स्वतःची ही माहिती दिली आहे. काही दिवसांपुर्वी सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला.

त्यानंतर तिच्यावर अँजिओप्लास्टीही झाली आहे. आता तिची तब्येत बरी आहे, असे सुष्मिताने सोशल मीडियातून सांगितले आहे.

47 वर्षीय सुष्मिता सेनने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि स्टेंटही टाकण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डॉक्टरांनी 'मेरा दिल काफी बडा है' असं सांगितलं.

तसेच, ज्या लोकांनी मला वेळेवर मदत केली, त्या सगळ्यांचे मी आभार मानते. या सगळ्यात चांगली बातमी अशी आहे की, मी आता पूर्णपणे बरी आहे आणि मी माझं आयुष्य पुन्हा जगण्यास तयार आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. या पोस्टसोबत तिने वडिलांबरोबरचा फोटोही शेअर केला आहे.

दरम्यान, सुष्मिताच्या या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. तिची पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. काही चाहत्यांनी तिच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे. तर काहींनी 'तू लवकर बरी होशील' असं म्हणत तिला धीर दिला आहे.

अलीकडच्या काळात सुष्मिताच्या 'आर्या' या वेबसीरिजने लोकप्रियता मिळवली होती. या सीरीजचे दोन सीझन लोकप्रिय ठरले असून आता सुष्मिता तिसऱ्यास सीझनमध्येही दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT