Sana Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Sana Khan : बॉलीवूड सोडून इस्लामच्या वाटेवर चालणाऱ्या सनाने दिली गोड बातमी...गोंडस मुलाला दिला जन्म

अभिनेत्री सना खानने नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिल्याने तिच्या चाहत्यांना उत्साहाला उधाण आले आहे.

Rahul sadolikar

Sana Khan Blessed With Baby Boy News: सना खानने एक बातमी देत आपल्या चाहत्यांना चांगलंच खुश केलं आहे. अभिनेत्री सना खानने बुधवारी इंस्टाग्रामवर आपल्या मुलाच्या जन्माची घोषणा केली.

तिने आणि तिचे पती अनस सय्यद यांनी त्यांच्या बाळाच्या आगमनाची बातमी त्यांचे चाहते आणि फॅन्ससोबत शेअर केली. आनंदाची बातमी शेअर करण्यासाठी तिने कुराणातील एक आयत शेअर केली.

सना आणि अनस यांनी सोशल मिडीयावर लिहीलंय की... “अल्लाह आम्हाला आमच्या बाळासाठी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवो.

अल्लाह की अमानत है बहतर बनाना है. तुमच्या प्रेम आणि दुआसाठी सर्वांना शुभेच्छा ज्याने आमच्या या सुंदर प्रवासात आमचे हृदय आणि आत्म्याला आनंद दिला,” असं या जोडप्याने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले.

याशिवाय त्यांच्या पोस्टसह एक छोटा व्हिडिओ देखील जोडला ज्यामध्ये लिहिले आहे, "अल्लाह तलने मुकद्दर मै लिखा फिर उसको पुरा किया और आसन किया, और जब अल्लाह देता है तो खुश और मुसररा के साथ देता है.

तो अल्लाह तलने हमे बेटा दिया (अल्लाहने आमच्या नशिबात हे लिहिले आणि नंतर आम्हाला ही भेट दिली. जेव्हा अल्लाह आपल्याला काही देतो तेव्हा तो त्याच्या पूर्ण मनाने आणि आनंदाने देतो. अल्लाहने आम्हाला मुलगा दिलाय)."

बिग बॉस 6 आणि सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटात काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सनाने नोव्हेंबर 2020 मध्ये अनसशी लग्न करण्यापूर्वी तिची अभिनय कारकीर्द सोडली.

सना खानने लग्नानंतर ईस्लाम धर्माचा स्वीकार केला. यापूर्वी मार्च 2023 मध्ये तिने एका मुलाखतीत तिच्या गरोदरपणाच्या बातमी खरं असल्याचं सांगितलं होतं.

या जोडप्यावर चाहत्यांनी कुटुंबावर आशीर्वादांचा वर्षाव केला. “अल्लाह आपके बेटे को नेक बनाए आमीन (अल्लाह तुमच्या मुलाला तुमच्यासारखा बनवो),” असे एकाने लिहिले. "माशाअल्लाह. अल्लाह लहान मुलाला आशीर्वाद देवो. आमिन,”

दुसऱ्याने लिहिले. आणखी एका चाहत्याने लिहिले, “माशाअल्लाह नवीन पालकांचे अभिनंदन. अल्लाह तुमच्या लहान कुटुंबाला आशीर्वाद देवो.” अशी पोस्ट लिहीत चाहत्यांनी सना आणि अनसचे अभिनंदन केलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT