Samantha Ruth Prabhu  Dainik Gomantak
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu: माझी अनेक अफेयर्स होती, माझे अनेक गर्भपात झाले...

घटस्फोटानंतर प्रथमच समंथा बिनधास्तपणे बोलली

Akshay Nirmale

Samantha Ruth Prabhu On Character Shaming: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू अलीकडच्या काळात सतत चर्चेत असते. अभिनेता पती नागा चैतन्य याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर ही दाक्षिणात्य अभिनेत्री थेट संपुर्ण भारतभरात फेमस झाली. तेव्हापासून तिच्या रिलेशनशिपच्या बातम्या, तिचे चित्रपट, तिचा आजार या सर्वांमुळे ती लाईमलाईटमध्ये आली आहे. नुकतेच समंथाने तिच्याविषयी चर्चिल्या जाणाऱ्या मुद्यांवर थेट आणि आक्रमकपणे बिनधास्त आपली मते मांडली आहेत.

समंथा दक्षिणेतील सर्वाधिक महागड्या नायिकांपैकी एक आहे. समंथाचे आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेले आहे. तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींमुळे अनेकदा तिच्याविषयी चर्चा होत असतात. सोशल मीडियावर त्यावरून बरीच मतमतांतरे व्यक्त होत असतात. त्यात तिचे कॅरेक्टर शेमिंगही होत असते. या चारित्र्यविषयक चर्चांवरच समंथाने आपली भुमिका आता स्पष्ट केली आहे.

कॅरेक्टर शेमिंगबाबत समंथा म्हणाली की, माझी अनेक प्रेम प्रकरणे आहेत, मला मुल नको होते, मी अनेकदा गर्भपात केला, मी संधीसाधु आहे... असे काहीबाही आता बोलले जात आहे. पण या लोकांना हे कळत नाही की घटस्फोट ही खूप वेदनादायी गोष्ट असते. ही संपुर्ण प्रक्रियाच खूप दुःखद आहे. खरेतरं त्यातून सावरण्याचा वेळच मला मिळालेला नाही. मला आधी त्यातून सावरू द्या. एकदा मी सावरले की, मी तुम्हाला खात्री देऊ शकते की, अशी कोणतीही गोष्ट माझा आत्मविश्वास तोडू शकणार नाही.

समंथा आणि नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये मोठ्या थाटात लग्न केले होते. दोघांचे वैयक्तिक आयुष्य काही काळ चांगले गेले. पण नंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. समंथाचे सासरे आणि अभिनेते नागार्जून यांनीही हा संसार वाचविण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते होऊ शकले नाही. दरम्यान, नागा चैतन्य सध्या हॉट अँड बोल्ड अभिनेत्री शोभिता धुलिपला हिच्याशी रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. ते दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. समंथाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर आगामी काळात ती 'शकुंतलम' या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT