Radhika Aapte Dainik Gomantak
मनोरंजन

सोशल मीडियावरील एका व्हिडीओमुळे राधिका आपटे पुन्हा चर्चेत

राधिकाला अशा अवस्थेत पाहून चाहते ही झाले अचंबित

दैनिक गोमन्तक

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आणी आपल्या बोल्ड भूमिकांमुळे ती बरेचदा चर्चेत आलेली अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली असून ती सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. बऱ्याचदा तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना असतात. यावेळी असंच घडलं असून सोशल मीडियावर एका व्हिडीओमुळे राधिका पुन्हा चर्चेत आली आहे. आणि तिला अशा अवस्थेत पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. (Actress Radhika Apte is back in the spotlight )

हा व्हिडीओ राधिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये ती निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. हा शर्ट तिच्या पोटाजवळ फाटलेला असून त्या ठिकाणी तिला झालेली जखम ती या व्हिडीओमध्ये दाखवताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते देखील हैराण झालेले आहेत. अनेकांना वाटत आहे की राधिका जखमी झालेली आहे. पण यात मोठा ट्वीस्ट आहे.

राधिकाच्या या व्हिडीओमध्ये राधिकाच्या पोटावर दिसत असेलेली जखम खरी नाहीये तर तिने एका शूटिंगसाठी केलेला प्रोस्थेटिक मेकअप आहे. हा मेकअप मुंबईतील उकाड्यामुळे वितळत असल्याचं राधिकानं सांगितलं आहे. राधिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून त्यावर युजर्सच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे. मात्र यामूळे बरेचदा तिला टीकेचाही सामना करावा लागला आहे. व सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

SCROLL FOR NEXT