Pareeniti - Raghav  Dainik Gomantak
मनोरंजन

Pareeniti - Raghav : परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा एकत्र महाकालेश्वर मंदिरात...भावी जोडप्याची पूजा संपन्न

अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी नुकतीच उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला भेट दिली.

Rahul sadolikar

Actress Parineeti Chopra- Raghav Chadha visited Mahakaleshwar temple : अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मिडीयावर सध्या सुरु आहेत.

नुकतीच या भावी पती-पत्नीने शनिवारी (26 ऑगस्ट) उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली.

राजस्थानमध्ये होणारा समारंभ

राजस्थानमध्ये सप्टेंबरमध्ये होणाऱ्या लग्नाच्या आधी, अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी शनिवारी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात प्रार्थना केली. त्यांनी मंदिरात छोटी पूजाही केली.

यावेळी परिणिती गुलाबी रंगाच्या साडीत , तर राघव पिवळ्या धोतरात दिसले. यावेळी त्यांच्या खांद्यावर लाल रंगाचे वस्त्र होते.

श्रावण महिन्यातील पूजा

श्रावण महिन्यात मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश निषिद्ध असल्याने परिणीती आणि राघव यांनी मंदिराच्या नंदीहालमध्ये बसून भगवान शंकराची पूजा केली.

मंदिराचे पुजारी यशगुरू यांनी पूजा केली. त्यांनी एएनआयला सांगितले, "श्रावण महिना सुरू आहे आणि अनेक प्रसिद्ध व्यक्ती बाबा महाकाल यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत आहेत. राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा भगवान महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. या दरम्यान त्यांनी पुरोहितांनी केलेले रुद्र सूक्त आणि शांतीपाठ ऐकले.”

राघव चढ्ढा यांचं निलंबन

दरम्यान राघव यांना नुकतेच राज्यसभेतून "विशेषाधिकार भंग" प्रकरणी निलंबित करण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम बायोमध्ये 'निलंबित खासदार, भारत' असे लिहिले आहे. लग्नाच्या तयारीसाठी तो आता परिणीतीसोबत कामाला लागले आहेत.

लग्न असं होईल

परिणिती आणि राघव उदयपूरच्या ओबेरॉय उदयविलासमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.  अलीकडील टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात एका स्त्रोताचा हवाला देऊन म्हटले आहे की, “हे एक भव्य लग्न असेल.

 परिणिती कुटुंबियांकडून होणार्‍या लग्न समारंभाबाबत अत्यंत उत्साही आहेत. परिणितीच्या टीमने आधीच तपशील आणि तिच्या तारखांवर काम सुरू केले आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती तिच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात होईल.” मिळालेल्या माहितीनुसार लग्नानंतर हे जोडपे गुरुग्राममध्ये रिसेप्शनही देतील.

साखरपुडा दिल्लीत पार पडला

परिणिती आणि राघव यांनी 13 मे रोजी नवी दिल्लीतील कपूरथला येथील घरात परिणितीची अभिनेत्री चुलत बहीण प्रियंका चोप्रा आणि अनेक राजकीय नेत्यांसह त्यांच्या जवळच्या मित्र- नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला . दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही पाहुण्यांमध्ये होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54.5 लाख पर्यटकांची नोंद, मंत्री रोहन खंवटेंची माहिती; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT