Nayanthara  Dainik Gomantak
मनोरंजन

Nayanthara: दीपिकासाठी रोल कापला? नयनतारा 'जवान'चा दिग्दर्शक ॲटलीवर नाराज असल्याच्या चर्चा

Jawan Star Nayanthara: जवानमुळे सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री नयनतारा चित्रपटाचा दिग्दर्शक ॲटलीवर नाराज असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.

Rahul sadolikar

Is Actress Nayantara upset with Director Atlee?: साऊथची ब्युटी क्वीन नयनतारा जवानचा दिग्दर्शक ॲटलीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.

7 सप्टेंबरला रिलीज झालेल्या जवानने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली असताना नयनताराचंही प्रचंड कौतुक होत आहे.

चित्रपटाने प्रचंड यश मिळवलं असताना नयनतारा नाराज असण्याचं कारण नेमकं काय आहे? असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे.

जवानचं यश आणि नयनतारा

नयनताराने सध्या धूमाकूळ घालत असलेल्या जवान ( Jawan ) मध्ये शाहरुख खानच्या प्रेयसीची भूमिका साकारत तिच्या अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांना प्रभावित केले आहे.

त्यामुळे नयनतारा पुढच्या बॉलीवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसणार हे सगळ्यांनाच वाटणं साहजिकच आहे. 

नयनतारा जवानच्या रिलीजनंतरही खुश नव्हती

पण सध्या समोर येत असलेल्या वृत्तानुसार तसे होणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री नयनतारा सध्या बॉलीवूडच्या कोणत्याही चित्रपटासाठी तयार नाही.

शिवाय आत्ता कोणतीही स्क्रिप्‍टही तिच्याकडे नाही. धक्कादायाक गोष्ट म्हणजे जवानच्या रिलीजनंतर ती खूश नव्हती.

नयनताराचा रोल कापण्यात आला होता?

इंडस्ट्रीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती ॲटलीवर खूप नाराज आहे कारण जवान चित्रपटात तिची भूमिका कापण्यात आली होती. 

तसेच, दीपिकाचे (पादुकोण) पात्र जाणीवपूर्वक मोठे करण्यात आले होते आणि नयनताराचा भाग जाणिवपूर्वक कापण्यात आला होता.

सध्या अशीही चर्चा सुरू आहे की या जवानमध्ये पदुकोणला विशेष भूमिका म्हणून श्रेय देण्यात आले आहे, परंतु अनेकांना असे वाटते की दीपिकाच चिपटाची अभिनेत्री होती. 

दिपीकाचा कॅमिओ हा अजिबातच कॅमिओ नव्हता. जवान हा जवळपास शाहरुख-दीपिका चित्रपटासारखा दिसला होता. 

नयनतारा सक्सेस पार्टीलाही हजर नव्हती

म्हणूनच कदाचित नयनताराने चित्रपट रिलीज होण्यापूर्वी किंवा नंतर कोणत्याही प्रमोशनला हजेरी न लावली नाही. 

गेल्या आठवड्यात मुंबईत नुकत्याच झालेल्या सक्सेस पार्टीलाही ती उपस्थित नव्हती, ज्यात विजय सेतुपतीसह सर्वांनी हजेरी लावली होती.

नयनताराला मिळालेली वागणूक

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार नयनतारा ही दक्षिणेकडील आघाडीची अभिनेत्री आहे, आणि म्हणूनच ती जवान मध्ये तिला मिळालेल्या वागणुकीबद्दल खूश नव्हती.आणि हेच कारण आहे की प्रेक्षक नयनताराला बॉलिवूडच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये पाहू शकत नाही..

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT