Jacqueline Fernandez Dainik Gomantak
मनोरंजन

Jacqueline Fernandez: 'ईडी' त्रास देत असल्याचा अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Jacqueline Fernandez: 200 कोटीच्या मनी लाँडरिंग प्रकरणात बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्या जामिन याचिकेवर उद्या, 11 नोव्हेंबर रोजी निर्णय येणार आहे. गुरूवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात झालेल्या सुनावणीत जॅकलीनने ईडी त्रास देत असल्याचा आरोप केला.

दरम्यान, याच सुनावणीत कोर्टानेही ईडीला फटकारले. जर जॅकलीन विरोधात पुरेसे पुरावे होते तर तिला अटक का केली नाही, असा सवाल कोर्टाने केला. तर जॅकलीनला नियमित जामिन दिला जाऊ नये, असा आग्रह ईडीच्यावतीने करण्यात आला. या सुनावणीवेळी कोर्टात पिंकी इराणीदेखील उपस्थित होती. पिंकीने सुकेश चंद्रशेखरकडील पैसे जॅकलीनला पोहचविल्याचा आरोप आहे.

जॅकलीन कोर्टात म्हणाली की, या प्रकरात तपास यंत्रणांना मी पुर्णतः सहकार्य केले आहे. मी स्वतः शरण आले आहे. तरीही ईडीकडून मला त्रास दिला जात आहे. मी कामानिमित्त परदेशता जात अशते. मला मला परदेशात जाण्यापासून रोखले जात आहे. मला माझ्या कुटूंबियांनाही भेटू दिले जात नाही. एजन्सीला मी मेल केले होते. पण त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यांना वाटते की मी देश सोडून पळून जाईन. मग त्यांनी मला लुकआऊट सर्क्युलर काढून थांबवले. ईडीने माझ्यावर केलेल सर्व आरोप निराधार आहेत.

ईडीच्या वकीलांनी जॅकलीन ही परदेशी नागरिक असून ती पळून जाऊ शकते, असे म्हटले होते. जॅकलीने चौकशीत, सुकेश आणि ती रिलेशनमध्ये होते. त्यामुळे सुकेशने तिला कोट्यवधी रूपयांचे गिफ्ट दिले होते, असे सांगितल्याचेही ईडीने म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

SCROLL FOR NEXT