Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dainik Gomantak
मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील प्रसिद्ध अभिनेत्रीचे निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप

मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी अभिनेत्रीचे सर्व आरोप फेटाळले आहेत

Rajat Sawant

तारक मेहता का उल्टा चष्मा शो काही काळापासून कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत येत आहे. गेल्या 15 वर्षांपासून या शोमध्ये रोशन सोढ़ी नावाची भूमीका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवाल हीने या शोला अलविदा केले आहे. तसेच या अभिनेत्रीने शोच्या निर्मात्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा शोचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर जेनिफरने शो सोडला आहे. ई-टाइम्स मधील वृत्तानुसार, जेनिफर मिस्त्रीने निर्माते असित मोदींबरोबरच प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याबद्दलची तक्रार दाखल केली आहे.

ई-टाइम्सला जेनिफर मिस्त्री यांनी प्रतिक्रिया दिली. म्हणाल्या, “होय, मी शो सोडला आहे. मी तारक मेहता का उल्टा चष्माचा माझा शेवटचा भाग यावर्षी 6 मार्च रोजी शूट केला हे बरोबर आहे. सोहिल रमाणी आणि इतर कार्यकारी निर्माता जतीन बजाज यांच्याकडून माझा अपमान करण्यात आल्याने मला सेट सोडावा लागला."

तारक मेहताच्या सेटवर तिच्या शेवटच्या दिवशी काय घडले याबद्दल विचारले असता, त्या म्हणाली, "7 मार्च, माझ्या लग्नाचा वाढदिवस आणि घटना घडली तेव्हा होळी होती. मला सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्मात्याने चार वेळा सेटवरून जाण्यास सांगितले होते. माझी कार मागे उभी करून जबरदस्तीने थांबवली आणि मला सेट सोडू देत नव्हते."

"मी गेल्या 15 वर्षांपासून या कार्यक्रमात काम करतेय, त्यामुळे तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती करू शकत नाही, असेही मी त्यांना सांगितले. पण यानंतर सोहेलने मला धमकावले. असित मोदींबरोबरच प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक छळ केल्याबद्दलची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान अभिनेत्रीच्या आरोपाबात आता असित यांचीही बाजू समोर आली आहे. असित यांनी अभिनेत्री जेनिफर हिचे सर्व आरोप फेटाळून लावले. ई-टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, "आम्ही तिला शो आणि माझ्या टीममधून काढून टाकले. माझ्या दिग्दर्शकाने आणि टीमने तिला शो सोडण्यास सांगितले. ती फक्त माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. ती सातत्याने मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमसोबत गैरवर्तणूक करत असे.  तिच्यामध्ये सेटवर आवश्यक शिस्त नाही आणि कामावरदेखील तिचे लक्ष नसायचे." असे मोदी यांनी सांगितले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...म्हणून गोवा सोडलं', आयोजकांनी पहिल्यांदाच सांगितलं IBW हलवण्याचं कारण; नेमका गोंधळ काय?

रानडुक्कर समजून झाडलेली गोळी मित्राला लागली; सावंतवाडीच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Opinion: भारताला उंच पुतळ्यांत नव्हे, तर एकेकाळी जगाला आपल्याकडे आदराने व कुतूहलाने पाहायला लावणाऱ्या गूढतेत शोधणे आवश्यक आहे..

Goa Live News: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाळीतून सुंदर नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचे जबरदस्त शक्तीप्रदर्शन

Ind Vs SA: भारत आफ्रिका सामन्यापूर्वी मोठी बातमी! 2 खेळाडू दुखापतग्रस्त; 'वॉशिंग्टन'लाही डच्चू? पंत, तिलकवरती नजर

SCROLL FOR NEXT