Shakuntalam Release On OTT : थिएटरनंतर आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघा शाकुंतलम...

अभिनेत्री समंथाचा शाकुंतलम आता OTT वरच्या फॅन्ससाठी सज्ज झाला आहे.
Shakuntalam Release On OTT
Shakuntalam Release On OTTDainik Gomantak
Published on
Updated on

समंथाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. समंथा रुथ प्रभूचा 'शाकुंतलम' 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अर्हाने या चित्रपटातून पदार्पण केले. 'शाकुंतलम' बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. हा चित्रपट कालिदासाच्या 'अभिज्ञान शाकुंतलम' या लोकप्रिय नाटकावर आधारित आहे. 

थिएटरनंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सर्व भाषांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाला आहे.

समंथा रुथ प्रभू आणि देव मोहन यांचा 'शाकुंतलम' चित्रपट Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला आहे,तसेच हा चित्रपट हिंदी तसेच तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड भाषांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

समंथा रुथ प्रभू , देव, सचिन खेडकर, कबीर बेदी, डॉ. एम. मोहन बाबू, प्रकाश राज, मधुबाला, गौतमी, आदिती बालन, अनन्या नागाला, जिशु सेनगुप्ता यांच्यासोबत चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या . या चित्रपटाची लांबी 1 तास 42 मिनिटे आहे आणि चित्रपटाला IMDB वर 4.7 रेटिंग मिळाली आहे. हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा समीक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या. अल्लू अर्जुनच्या मुलीने या चित्रपटात राजकुमार भरतची भूमिका साकारली होती.

Shakuntalam Release On OTT
Adipurush Motion Picture Release : प्रभासच्या आदिपुरूषचे हे मोशन पोस्टर पाहिले का? ६० सेकंदांचा व्हिडिओ वेड लावील..

शकुंतलमच्या आधी समंथा रुथ प्रभूच्या 'यशोदा' या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली होती, पण लवकरच बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई कमी झाली. शाकुंतलमच्या अपयशानंतर दुःख व्यक्त करताना, समंथाने भगवद्गीतेतील काही ओळी शेअर केल्या, ज्यात 'कर्मण्ये वधिका जाती मा फलेषु कदाचन मा कर्म फला हे तूर भू मा ते संगोत्सव कर्मणी' असे लिहिले आहे.

शकुंतलमचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. समंथा रुथ प्रभूने स्वतः एका इव्हेंटमध्ये खुलासा केला होता की तिने यापूर्वी 'शाकुंतलम' नाकारले होते कारण तिच्यात हे पात्र साकारण्याचे धैर्य नव्हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com