Shahrukh Khan on Gadar 2 Dainik Gomantak
मनोरंजन

Shahrukh on Gadar 2 : तारासिंहचं यश पाहुन जवान भारावला...जुनी नाराजी विसरुन शाहरुखने केले सनीचे कौतुक

अभिनेता सनी देओलचा गदर सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे, आता बॉलीवूडच्या किंग खाननेही सनीच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

Rahul sadolikar

Shah Rukh Khan on Gadar 2: अभिनेता सनी देओलच्या गदर 2 बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले आहे. आता शाहरुख खाननेही सनीचं कौतुक केलं आहे.

शाहरुख खान सध्या त्याच्या 'जवान' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. शाहरुख खान आणि नयनतारा स्टारर जवान हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. 

चित्रपटात जबरदस्त अॅक्शनसोबतच अभिनेत्याचे वेगळे लूकही पाहायला मिळणार आहेत. आता 'जवान' रिलीज होण्याआधी, शाहरुख खानने ट्विटरवर (X) त्याच्या चाहत्यांसोबत #AskSRK सेशन केले. यावेळी चाहत्यांनी शाहरुख खानला अनेक मजेदार प्रश्न विचारले.

युजर्सच्या प्रतिक्रिया

आस्क एसआरके सत्रादरम्यान, एका चाहत्याने शाहरुख खानला विचारले , "तुम्ही सनी देओलचा 'गदर 2' चित्रपट पाहिला आहे का?" यावर शाहरुखने होकारार्थी उत्तर दिले, शाहरुख म्हणाला "हो, मला तो खूप आवडला." 

शाहरुख खान चे हे उत्तर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि यूजर्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. 

शाहरुख खानच्या या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, तो खोटं बोलत आहे. तर तिथे आणखी एका यूजरने लिहिले की, "हा चित्रपट पठाणचा रेकॉर्ड मोडेल."

एकेकाळचा वाद आणि शत्रूत्व

शाहरुख खान आणि सनी देओल एकेकाळी शत्रू होते. या दोघांना एकमेकांचा चेहरा पाहणेही पसंत नव्हते. वास्तविक, 'डर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यात शत्रूत्व निर्माण झाले होते.

 'डर' चित्रपटात शाहरुख खानने खलनायकाची भूमिका साकारली होती. ही भूमीका प्रेक्षकांना आवडली होती, पण सनी देओलच्या नायकाच्या भूमिकेकडे लक्ष गेले नाही. यामुळे सनीला चांगलाच राग आल्याची त्या काळात चर्चा होती. 

सनीने स्वत:ची जीन्स फाडली होती

कपिल शर्माच्या शोमध्ये सनी देओलने स्वत: हे कबूल केले होते की, चित्रपटाच्या सेटवर रागाच्या भरात त्याची जीन्स फाडली. मात्र, आता शाहरुख खानचे हे ट्विट पाहून असे दिसते आहे की, त्याचे आणि सनी देओलमधील शत्रूत्व आता संपले आहे.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT