Rohit Roy on Salman Dainik Gomantak
मनोरंजन

Rohit Roy on Salman : "सलमान मला 'जाड गाय' म्हणाला" अभिनेत्याने सांगितला किस्सा...

अभिनेता रोहित रॉयने सलमानसोबतची एक आठवण शेअर केली आहे.

Rahul sadolikar

एका मुलाखतीत, अभिनेता रोहित रॉयने सलमानसोबतची एक आठवण शेअर केली आहे. एका मुलाखतीत बोलताना रोहितने सांगितले त्याला इंडस्ट्रीत काम मिळत नव्हते आणि त्यानंतर तो सलमान खानलाही भेटला होता. की तो काही वर्षांपूर्वी सलमान खानला भेटला होता आणि इंडस्ट्रीमध्ये त्याला कोणत्या प्रकारचे काम मिळत आहे याबद्दलची निराशा शेअर केली होती

रोहितला सलमान जाड गाय म्हणाला

रोहित रॉय जवळपास दोन दशकांपासून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे आणि सध्या खतरों के खिलाडीच्या 13 व्या सीझनचा भाग आहे. 

सिद्धार्थ कन्ननच्या एका नवीन मुलाखतीत ,रोहितने संभाषणादरम्यान सलमान खानने त्याला 'एक जाड गाय' म्हटले तेव्हाची आठवण सांगितली. सलमानच्या त्याच्यावरच्या टिप्पणीमुळेच रोहितने हे चॅलेंज समजून आपल्या शरीराकडे लक्ष दिले.

सलमान आणि रॉक हडसन

सिद्धार्थ कन्ननच्या एका नवीन मुलाखतीत रोहितने सांगितले की त्याच्या कारकिर्दीत एक वेळ अशी आली की त्याला चांगल्या भूमिका मिळत नव्हत्या आणि त्याच्या टेलिव्हिजनच्या कामामुळे तो निराश झाला होता..

रोहित बोलताना म्हणाला  “जेव्हा मी अभिनेता बनण्याचा विचार करत होतो, तेव्हा सलमानने मला सांगितले की तू 60 च्या दशकातील हॉलिवूड अभिनेत्यासारखा दिसत आहेस, तू तसा पोशाख करतोस,” रोहित पुढे म्हणाला की सलमान त्याच्या लुकची तुलना हॉलिवूड अभिनेता रॉक हडसनशी करायचा.

सलमानची भेट

पुढे, रोहितने सांगितले की अहमदाबादमधील सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये तो सलमान खानला भेटला आणि त्याच्याशी संवाद साधला. तो म्हणाला, “माझे वजन वाढले होते; गोष्टी व्यवस्थित होत नसल्यामुळे मी वैतागलो होतो. मी सलमानला सांगितले की मी खूश नाही. 

तू जाड गाय आहेस?

मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पण काही घडत नाहीये आणि त्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला की तू तर जाड गाय आहेस, मी तुला काही काम देणार नाही. त्यादिवशी त्याने माझ्यासोबत जे काही शेअर केले त्यामुळे माझे शारीरिक रूपांतर पूर्ण झाले. 

मला स्वत:ला तयार करायचे होते

मी 45-46 वर्षांचा होतो आणि मी ठरवले की मी 50 ला स्पर्श करण्यापूर्वी मला सर्वात सेक्सी असा 50 वर्षांचा पुरूषा व्हायचे आहे आणि ते घडले. तो म्हणाला, एकतर असेच राहा, नाहीतर भांडत राहा. असे नव्हते की मी वाईट दिसत होतो, परंतु मला वाटले की मी आणखी चांगला असू शकतो.”

रोहित वर्कफ्रंट

रोहितने हृतिक रोशन स्टारर 'काबिल' या चित्रपटाची निवड केली. मुंबई सागा आणि गेल्या वर्षीच्या फॉरेन्सिकमध्येही तो दिसला होता.

दरम्यान, सलमानच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेवटच्या रिलीज झालेल्या किसी की भाई किसी की जानने बॉक्स ऑफिसवर कमी कामगिरी केली. तो पुढे कतरिना कैफसोबत टायगर 3 मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 10 नोव्हेंबरला दिवाळीत रिलीज होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT