Kamal Haasan Dainik Gomantak
मनोरंजन

Kamal Haasan: कमल हसन यांचे हिंदी भाषेवरचे हे विधान वादग्रस्त ठरू शकते.

अभिनेता कमल हसन यांनी हिंदी भाषेवर केलेल्या या विधानाने नवा वाद ओढवु शकतो.

Rahul sadolikar

अभिनेते कमल हसन आपल्या बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. एखादी गोष्ट मांडताना ते कसलीच भीडभाड बाळगत नाहीत. आता त्यांनी केलेल्या या विधानाने नवा उद्भवण्याची शक्यता आहे.

हिंदी आणि तमिळ भाषेचा वाद नवीन नाही. वेळोवेळी तमिल भाषीक हिंदी त्यांच्यावर लादल्याचा आरोप करत असतात. दक्षिण भारतातला हा संवेदनशील मुद्दा आहे.याच मुद्द्यावर अभिनेते कमल हसन यांंनी आपलं मत मांडलं आहे. दाक्षिणात्य सिनेमापासुन हिंदी सिनेमावर आपली एक वेगळी छाप सोडणाऱ्या कमल हसन यांनी हे मत त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर मांडलं आहे.

कमल हसन यांनी केरळचे खासदार जॉन ब्रिटास यांच्या ट्वीटला रिट्वीट करत तमिळ भाषेत पोस्ट शेयर करत आपलं मत मांडलं आहे. "मातृभाषा हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. इतर भाषा बोलणं किंवा ती शिकणं हे प्रत्येकाचा व्यक्तीगत आवडीचा भाग आहे. हिंदीला दुसऱ्यांवर लादणं हे मुर्खपणाचं आहे. आणि ती लादली गेली तर तीचा विरोध होणार"

कमल हसन यांचे सगळे ट्वीट तमिळ भाषेत आहेत. सीपीआईएम चे खासदार जॉन ब्रिटास यांनी एक व्हिडीओ ट्वीट करताना कॅप्शन लिहलं होतं "हिंदी लादण्याचा तुमचा प्रयत्न या देशाला बरबाद करेल. जर सुंदर पिचाई यांनी गुगलची परिक्षा हिंदीत दिली असती तर ते गुगलमध्ये टॉप पोस्टवर असते का?" याच ट्वीटचं समर्थन कमल हसन यांनी केलं आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

कलारंगाची उधळण करणारा Colors of Resilience! दिव्यांगांसाठी नवीन अध्यायाची सुरुवात..

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला केवळ दोन दिवस बाकी; यात्रेकरूंच्या राहण्याची, पार्किंगची तयारी कुठवर आली?

Cash For Job Scam: लाखोंचा गंडा घालणाऱ्या 'दीपश्री'ला कोर्टाचा पुन्हा दणका; सुनावली 8 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT