World Environment Day Dainik Gomantak
मनोरंजन

World Environment Day : 'पेड लगाओ भिडू'! अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी दिला 'पर्यावरण वाचवा' चा संदेश... व्हिडीओ व्हायरल

अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला आहे.

Rahul sadolikar

अभिनेते जॅकी श्रॉफ यांना त्यांचे सगळे फॅन्स सोशल मिडीयावर पर्यावरण वाचवण्याचा संदेश देताना पाहत असतात. अगदी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात जातानाही त्यांच्या हातात एखादं रोपटं असतंच.

आज जागतिक पर्यावरण दिन त्यानिमित्त अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी लोकांना पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला आणि वृक्षारोपणाची एक छोटीशी मोहिमही आखली होती.या कार्यक्रमातला एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, त्यात ते लोकांना पर्यावरण वाचवण्याचा संदेश देताना दिसतात.

पेड लगाओ भिडू

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, जॅकी श्रॉफ आमच्याशी झाडे लावण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्याच्या मोहिमेबद्दल सांगताना दिसले आणि त्यांना असे वाटते की आपण वनस्पतींना कुटुंबातील सदस्य मानले पाहिजे स्पायडर प्लांटचा हार घालण्यापासून आणि भेटवस्तू म्हणून रोपे घेऊन जाण्यापर्यंत त्यांनी उपस्थित लोकांना त्यांच्या स्टाईलमध्ये झाडे लावण्यास संदेश दिला आहे.

पेड लगाओ भिडू

जॅकी श्रॉफ या व्हिडीओत म्हणतात ' पेड लगाओ भिडू . सबका काम है पेड लगाना. नही लगाना तो मारो जल के'- . रोपांना पाणी देणे आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त , जॅकी श्रॉफ ज्यांना सोशल मीडियावर कॅप्टन प्लॅनेट म्हटले जात आहे त्यांनी पर्यावरणाची काळजी घेणे आणि बऱ्याच गोष्टींबाबतीत संदेश दिला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणतात

व्हिडिओमध्ये, वृक्षारोपण मोहिमेत मीडियाशी संवाद साधताना अभिनेते जॅकी श्रॉफ म्हणतात. “झाड लावून काही उपकार नाही केले,”. पुढे बोलताना ते म्हणतात की , “जी गोष्ट आपल्याला जीवंत ठेवते त्या गोष्टीला आपण जिवंत ठेवायला हवं . पण ही अक्कल मला जरा उशीरा आली. पूर्वी आपण खाल्लेल्या फळांच्या बिया जतन करायचो. जगभर प्रवास करत असतानाही, जर आम्हाला काहीतरी चांगलं दिसलं, तर आम्हाला ते स्वतः वाढवल्यासारखं वाटतं.

निसर्गाशी जोडण्याचा माझा मार्ग

लहानपणी आम्ही शाळेत झाडे लावायचो - ती झाडं आता मोठी झालेली पाहुन खूप बरं वाटतं. त्यामुळे ही गोष्टीचं शिक्षण सुरुवातीपासूनच होते. कधी कधी आपण त्यापासून दूर जातो इतकेच. शेती करणे, झाडे लावणे आणि संदेश पसरवणे यात मला आनंद मिळतो. निसर्गात अनवाणी उभे राहणे, माझ्या रोपांना पाणी देणे; निसर्गाशी जोडण्याचा हा माझा मार्ग आहे.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT