Dalip Tahil Dainik Gomantak
मनोरंजन

Dalip Tahil : 'हम है राही प्यार के' मध्ये मला आमिरनेच कास्ट केले, ज्येष्ठ अभिनेत्याने सांगितली आठवण

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांनी हम है राही प्यार के चित्रपटाची एक आठवण सांगितली आहे.

Rahul sadolikar

अभिनेता आमिरचा 90 च्या दशकातला गाजलेला चित्रपट म्हणुन हम है राही प्यार के या चित्रपटाचा उल्लेख करता येईल. बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते हम हैं राही प्यार के मध्‍ये मिस्टर बिजलानीची भूमिका साकारणारे अभिनेते दलीप ताहिल म्हणतात की, मला खात्री नव्हती की मी या सिंधी पात्राला नकारात्मक छटा दाखवू शकेल. ताहिल यांनी या चित्रपटाची एक आठवण सांगितली आहे.

आमिरने केले होते कास्ट

हम हैं राही प्यार के मध्‍ये मिस्टर बिजलानी या एका धूर्त सिंधी उद्योगपतीची भूमिका साकारणारे अभिनेते दलीप ताहिल यांना चित्रपटाचा प्रमुख अभिनेता आमिर खानने (ज्याने राहुल मल्होत्राची भूमिका केली होती) चित्रपटात कास्ट केले आहे, त्यामुळेच चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी दलीप ताहिल यांना कॅमेरासमोर नकारात्मक भूमिका साकारण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. हम है राही प्यार के या चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत

आमिरने व्यक्त केली इच्छा

“एके दिवशी, आमिरने मला फोन केला आणि विचारले की तुम्ही घरी आहात का?, आणि अर्ध्या तासात तो माझ्या दारात आला. त्याने मला चित्रपटात एक भूमिका ऑफर केली, आणि सांगितले की हे एक अतिशय विलक्षण सिंधी पात्र आहे आणि मी ते करावे अशी त्यांची इच्छा होती,” .

सुरूवातीला मी तयार नव्हतो!

ताहिल कबूल करतो की, सुरुवातीला मला वाटले होते की मी ही भूमिका करू शकणार नाहीत. “मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असे काहीही केले नव्हते, अशी ओव्हर-द-टॉप भूमिका. पण आमिर म्हणाला, 'नाही, मला खात्री आहे की तू ते करू शकशील.' आणि त्याचा माझ्यावर इतका विश्वास होता, म्हणून मला ते करण्याचे धैर्य मिळाले,” .

हा आनंद होता

'हम हैं राही प्यार के ' मध्ये भट्टसोबत काम करणे हा एक आनंद होता असं ताहिल म्हणतात . आमिरचं कौतुक करताना ताहिल पुढे म्हणाले “आमिर नेहमी म्हणायचा, 'फक्त कर आणि इतर कशाचाही विचार करू नकोस, मी सांभाळून घेईन'. मला त्याची काम करण्याची पद्धत आवडते, कारण त्यात भरपूर स्वातंत्र्य आहे. तो तुम्हाला नैसर्गिकरित्या काम करायला सांगतो आणि त्यानुसार कॅमेराची हालचाल बदलली जाते.”

आजही हा चित्रपट आठवतो कारण

आमिर, जुही आणि सर्व मुलांसह चित्रपटातील प्रत्येकाची व्यक्तिरेखा अतिशय विश्वासार्ह होती, ज्यामुळे चित्रपट सदाबहार होतो असे ताहिल यांना वाटते. ते म्हणतात हा चित्रपट त्याची कॉमेडी, कौटुंबिक स्पर्श आणि अप्रतिम स्टार कास्ट यासाठी तो नेहमीच संस्मरणीय असेल. ते परिपूर्ण संयोजन होते. तरीही, जेव्हा जेव्हा कोणीही चाहता माझ्या पात्राचे नाव घेतो तेव्हा सर्व आठवणी परत आठवतात.

अंडी फेकण्याचा सीन

चित्रपटातील मुलांना ताहिलच्या पात्रावर अंडी फेकायची होती, या सीनमध्ये, अभिनेता आमिरने सेटवर एक प्रँक केला होता त्याचीही आठवण ताहील यांनी सांगितली. ते सांगतात “अंडी कृत्रिम असायला हवी होती पण आमिरने लहान क्रॅक असलेली खरी अंडी विकत घेतली. त्या प्रँकने प्रत्येकाला चांगलेच हसू दिले आणि शॉटला अधिक वास्तविक आणि नैसर्गिक होण्यात मदत झाली,” .

कुणाल खेमूला नंतर ओळखले नाही

“कुणाल खेमू या चित्रपटात लहान होता आणि तो सेटवर खूप मजा करत होता. बर्‍याच वर्षांनंतर त्याने मला सांगितले की आम्ही एकत्र चित्रपट केला आहे. मला आठवत नव्हते. मी विचार करू लागलो. आणि मग त्याने मला सांगितले की तो या चित्रपटातील बाल कलाकारांपैकी एक होता,” .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझे घर' योजनेचा लाभ घ्या; मुख्यमंत्री सावंतांचे गोमंतकीयांना आवाहन, 1972 पूर्वीची घरे नियमित होणार

Amba Ghat Landslide: कोकणात मुसळधार पावसाचा तडाखा, आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

America Accident: अमेरिकेत भीषण अपघात! यू-टर्न घेणाऱ्या ट्रकला धडकली कार, तिघांचा जागीच मृत्यू; भारतीय चालकावर हत्त्येचा आरोप VIDEO

44, 35 ते 30 लाख गोव्यात कोणत्या मंत्र्याकडे महागडी कार? कोण वापरतंय सर्वात स्वस्त गाडी Video

Asia Cup 2025: IND vs PAK मॅच होणार नाही! आशिया कपमधून पाकिस्तान 'आऊट', आता 'या' देशाच्या संघाला मिळणार संधी

SCROLL FOR NEXT