MC Stan Dainik Gomantak
मनोरंजन

MC Stan: मंडलीमध्ये पडली फूट; एमसी स्टॅन अन् अब्दूचा वाद...

MC Stan: प्रेक्षकांना यांची मैत्री विशेष भावली.

दैनिक गोमन्तक

MC Stan: बीग बॉस 16 शो अनेक कारणांनी चर्चेच्या आणि प्रसिद्धीच्या झोतात होता. या शोमध्ये असलेल्या स्पर्धकांमुळे हा शो चांगलाच गाजला. मात्र या सर्व स्पर्धक आणि गटामध्ये लक्ष वेधून म्हणजे मंडलीने घेतले होते.

सुंबुल तौकिर, अब्दू रोझिक, शोचा विजेता एमसी स्टॅन, मास्टरमाइंड शिव ठाकरे , निम्रित कौर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान यांच्या गटाला मंडली म्हणून संबोधले गेले. प्रेक्षकांना यांची मैत्री विशेष भावली.

आता मात्र या मैत्रीमध्ये दरार पडल्याचे दिसून येत आहे. बिग बॉसचा 16 चा विजेता एम सी स्टॅन आणि अब्दू रोझिक यांच्यामध्ये तक्रार दिसून आली आहे.

अब्दू रोझिकने म्हटले आहे की , एम सी स्टॅन मिडियामध्ये माझ्याविषयी खोटी माहिती पसरवत आहे. अब्दूच्या म्हणण्यानुसार, माझ्या गाण्याला प्रमोट करण्यासाठी मी एमसी स्टॅनला विनंती केली होती असे स्टॅनने मिडियामध्ये बोलताना म्हटले आहे.

मात्र अब्दूच्या म्हणण्यानुसार, मी कधीच माझ्या गाण्याला प्रमोट करण्यासाठी स्टॅनला विनंती केली नाही. स्टॅन माझ्याबद्दल चूकीची माहिती पसरवत आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, मी एम सी स्टॅनवर प्रेम करतो. माहिती नाही स्टॅन माझ्याविषयी असे का बोलत आहे. मात्र मला आता स्टॅनविषयी काही बोलायचे नाही. आमची मैत्री आता संपली आहे असे अब्दूने म्हटले आहे.

आता एमसी स्टॅन यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अब्दू आणि स्टॅनच्या वादाच मंडली तशीच कायम राहणार की मंडलीलाही धक्का लागणार हे पाहणेदेखील महत्वाचे ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punav Utsav: ‘देवाच्या पुनवे’ला उसळली गर्दी! देवी सातेरी, भगवतीचा उत्सव; आगरवाडा, पार्सेवासीय भक्तीत दंग

Goa Live News Updates: चलो बुलावा आया है! काँग्रेस हायकमांडकडून गोव्यातील नेत्यांना दिल्लीत येण्याचे आदेश

Purple Fest: पर्पल फेस्टसाठी गोवा सज्ज! 15 हजारांहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग; मंत्री फळदेसाईंनी दिली माहिती

Panaji: इस्रायली कारवायांविरोधात आंदोलन! पणजीत 60 नागरिकांवर कारवाई; परवानगी नसल्याने पोलिसांनी रोखले

Goa Mining: खाण खाते खटल्यांच्या जंजाळात! 130 प्रकरणे सुरु; खाणी सुरू करताना अडथळ्यांची शर्यत

SCROLL FOR NEXT