Aamir Khan Threat Dainik Gomantak
मनोरंजन

Aamir Khan Threat: सलमाननंतर आमिर खानला जीवे मारण्याची धमकी, सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; बिश्नोई गँगचे नाव समोर

Aamir Khan Recieves Threats: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननंतर आता अभिनेता आमिर खानला देखील जीवे मारण्याची कथित धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

Manish Jadhav

Aamir Khan Recieves Threats: बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननंतर आता अभिनेता आमिर खानला देखील जीवे मारण्याची कथित धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत असून, यामध्ये आमिरला थेट लक्ष्य करण्यात आले. या व्हायरल पोस्टचा संबंध थेट कुप्रसिद्ध लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडला जात असल्यामुळे मनोरंजन विश्वात आणि आमिर खानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खानवर (Amir Khan) 'लव्ह जिहाद'ला प्रोत्साहन दिल्याचा गंभीर आरोप करत ही धमकी देण्यात आली. या खळबळजनक बातमीमुळे सोशल मीडियासह संपूर्ण बॉलिवूड वर्तुळात एकच हलकल्लोळ माजला.

व्हायरल होत असलेल्या या धमकीच्या पोस्टमध्ये अत्यंत आक्रमक भाषेचा वापर करण्यात आला. रिपोर्टनुसार, या पोस्टमध्ये स्वतःचा उल्लेख 'आरजू बिश्नोई' आणि 'टायसन बिश्नोई' (लॉरेन्स बिश्नोई गँग) असा करणाऱ्या व्यक्तीने लिहिले की, ते सनातन धर्म आणि देशाच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कृत्याचा तीव्र विरोध करतात. आमिर खानसारखे सेलिब्रिटी स्टारडमच्या नावाखाली अशा चुकीच्या गोष्टींना खतपाणी घालत असल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला असून, अशा लोकांना सोडणार नाही, अशी धमकीही देण्यात आली.

याशिवाय, राजस्थानमध्ये एका निष्पाप मुलीसोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करत, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही कडक कारवाईची भाषा या पोस्टमध्ये करण्यात आली.

या गंभीर प्रकरणावर अद्याप आमिर खान किंवा त्याच्या अधिकृत टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाल्यानंतर देशातील सुरक्षा आणि तपास यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या आहेत. मुंबई पोलीस आणि सायबर सेलचे पथक या व्हायरल पोस्टची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहे. ही पोस्ट खरोखरच बिश्नोई गँगकडून आली आहे की केवळ कोणीतरी खोडसाळपणा करुन अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. सलमान खानला मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर आता आमिर खानचे नाव समोर आल्यामुळे मुंबई पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही कसर सोडत नसून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT