Laal Singh Chaddha Kahani Video Song Dainik Gomantak
मनोरंजन

Kahani Video Song: अमीर करीनाचा रोमान्स; 'लाल सिंग चड्ढा'चा पहिला म्युझिक व्हिडिओ लॉन्च

लाल सिंग चड्ढाच्या निर्मात्यांनी अखेर 'कहानी' गाण्याचा बहुप्रतिक्षित म्युझिक व्हिडिओ रिलीज केला.

दैनिक गोमन्तक

लाल सिंग चड्ढाच्या (Laal Singh Chaddha) निर्मात्यांनी अखेर 'कहानी' गाण्याचा बहुप्रतिक्षित म्युझिक व्हिडिओ रिलीज केला. या गाण्याचे ऑडिओ व्हर्जन मोहनने गायले आहे तर गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सोनू निगमने दिला आहे तसेच या गाण्याला देशभरातून प्रेम आणि दाद मिळात आहेत. एवढेच नाही तर 'कहानी' हे गाणे यावर्षी रिलीज झालेल्या सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गाण्यांपैकी एक आहे. व्हिडिओसह गाणे आणखी सुंदर आणि अर्थपूर्ण दिसते यात शंकाच नाही. या गाण्यात आमिर खानची (Amir Khan) वेगळी स्टाइल चाहत्यांना पाहायला मिळत आहे. (Laal Singh Chaddha Kahani Song Relese)

'कहानी' गाण्याचा व्हिडिओ हा हृदयस्पर्शी आहे. 'कहानी' या गाण्यात प्रीतम यांनी संगीत दिले असून अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. आमिर खानच्या या गाण्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. हे गाणे रिलीझ झाल्याच्या 24 तासांत इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक बनले आणि प्रभावी रेकॉर्ड देखील बनवत आहे.

आमिर खानने आपला आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढा ची सर्व गाणी म्युझिक व्हिडिओशिवाय रिलीज केली होती जेणेकरून संगीतकार, गायक, गीतकार आणि तंत्रज्ञांना चर्चेमध्ये ठेवता येईल. स्टारने आत्तापर्यंत 'कहानी', ''मैं की करां?', 'फिर ना ऐसी रात आएगी' आणि 'तूर कलेयां' ऑडिओ आवृत्तीमध्ये रिलीज केली आहेत आणि निर्मात्यांनी पहिल्यांदाच याचा संगीत व्हिडिओ रिलीज केला आहे. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT