Aadipurush First Song Release Dainik Gomantak
मनोरंजन

Aadipurush First Song Release : क्या बात है... आदिपुरुषमधलं अजय - अतुलचं हे गाणं ऐकलंत का?

गेल्या काही काळापासुन आदिपुरूष हा चित्रपट वादात सापडला होता पण या गाण्यामुळे प्रेक्षक नक्कीच चित्रपटावर खुश होतील.

Rahul sadolikar

सुरूवातीच्या काळात आदिपुरुष हा चित्रपट ट्रोलर्सच्या निशाण्यावर होता मात्र आता चित्रपटाची चांगली चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यातच आता चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची चर्चा सुरू आहे. सध्या सगळीकडे ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाची चर्चा आहे. आदिपुरुषचा ट्रेलर अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. आदिपुरुषचा ट्रेलरला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

आदिपुरुषच्या ट्रेलरमध्ये प्रभास, क्रिती सेनन अनुक्रमे श्रीराम आणि सीतेच्या भूमिकेत झळकत आहेत. आता आदिपुरुषचा सिनेमातलं पहिलं गाणं लाँच झालंय. या गाण्यातून श्रीरामभक्तीचा जागर दिसतोय.

आदिपुरुष सिनेमातलं पहिलं गाणं जय श्री राम आज भेटीला आलंय. आदिपुरुष सिनेमाच्या टिझर आणि ट्रेलरपासून बॅकग्राउंडला वाजणाऱ्या जय श्री राम गाण्याची उत्सुकता होती. अखेर आज भव्य दिव्य पद्धतीने सिनेमाचे संगीतकार आणि गाण्याचे गायक अजय अतुल यांच्या उपस्थितीत हे गाणं लाँच झालंय. जय श्री राम हे गाणं ऐकून अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. अजय - अतुलच्या संगीताने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

काहीच दिवसांपुर्वी आदिपुरुषच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात क्रिती सेननने प्रभासबद्दल कौतुकाचे शब्द काढले. प्रभास हा आदिपुरुष सिनेमात भगवान श्रीरामांची भूमिका साकारत आहे.

प्रभास आणि क्रिती सॅनन स्टारर 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी मंगळवारी चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. ट्रेलर लाँचच्या वेळी, क्रिती सेनन म्हणाली की तिचा सहकलाकार प्रभास हा भगवान रामसारखा आहे - एक "साधा" माणूस जो "मनापासून" सरळ बोलतो.

याशिवाय याच ट्रेलर लॉंच सोहळ्यात प्रभास म्हणाला "मला सध्या खूप त्रास होत आहे. 'आदिपुरुष' हा आपल्या सर्वांसाठी एक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल मी कृतज्ञ आहे. खूप कमी कलाकार आहेत ज्यांना भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.

त्यामुळे मला खूप धन्य वाटते. मला या पात्राबद्दल आदर आणि कौतुक वाटले पण मी या चित्रपटासाठी शटिंग केल्यामुळे याबद्दल आदर खुप वाढला. माझ्यासाठी, जानकीने एक शुद्ध, दयाळूपणाचे संयोजन प्रतिनिधित्व केले. खंबीर मनाचा आत्मा.

मी माझे 200 टक्के या भूमिकेसाठी दिले आहेत. ते देव होते, आम्ही फक्त माणसे आहोत. त्यामुळे जर काही कमतरता असेल तर मला माफ करा," असे अभिनेता म्हणाला.

या चित्रपटात प्रभास भगवान राम, क्रिती सेनॉन देवी सीता, सनी सिंग लक्ष्मण आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 की 3? आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? थकबाकीचं संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

Stray Dog Management: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात दिरंगाई; 8 पंचायत सचिवांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

SCROLL FOR NEXT