Manoj Wajpeyee in zoram  Dainik Gomantak
मनोरंजन

वेगळा लूक, वेगळी भूमीका...मनोज वाजपेयीचा 'झोरम' सज्ज

अभिनेता मनोज वाजपेयी त्याच्या आगामी जोरममधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Rahul sadolikar

Manoj Wajpeyee in zoram : अभिनेता मनोज बाजपेयीच्या आगामी 'झोरम' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या थ्रिलर ड्रामा चित्रपटाशी संबंधित प्रत्येक बातमीवर चाहते लक्ष ठेवून आहेत. निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच त्याची रिलीज डेट जाहीर केली होती. 

टीजर

आता त्याच्या टीझरशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे. या चित्रपटाच्या टीझर रिलीजची तारीख शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. स्वतः मनोज बाजपेयी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे या टीझरची माहिती दिली आहे. 

प्रेक्षकांसाठी गूड न्यूज

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही गूड न्यूज आहे. या चित्रपटाचा टीझर 18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. मनोज बाजपेयीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

त्यासोबत लिहिले आहे की, 'झोरम' चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार आहे. व्हिडीओ पाहून अंदाज बांधता येईल की या चित्रपटात अॅक्शन आणि थ्रिलचा पुरेपूर डोस असेल. व्हिडिओच्या पार्श्वभूमीतून आवाज येतो, 'माओवादी मुंबईत पोहोचले आहेत. काहीही होऊ शकते'.

चित्रपट प्रदर्शित झाला

हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्याआधीच अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रशंसा मिळाली आहे. मुंबईतील प्रीमियर स्क्रिनिंगमध्येही या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. मनोज बाजपेयी व्यतिरिक्त मोहम्मद झीशान अय्युब, राजश्री देशपांडे, तनिष्ठा चटर्जी आणि स्मिता तांबे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

मनोज वाजपेयी म्हणाला

एएनआयशी बोलताना मनोज बाजपेयी म्हणाला, 'हा खूप खास चित्रपट आहे. मी 2016 मध्ये त्याची स्क्रिप्ट ऐकली होती. या चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी मी अनेक किलो वजन कमी केले आहे. माझ्यासाठी हा सर्वोत्तम चित्रपट आहे.

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT