कधी कधी अमिताभ बच्चन यांनाही सल्ला देता येतो याचा प्रत्यय नुकताच कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर आला आहे. अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असतात. त्यांच्या या सवयीमुळे त्यांना आता कौन बनेगा करोडपतीच्या एका स्पर्धकाने सल्ला दिला आहे.
मेगास्टार कौन बनेगा करोडपतीच्या नवीन भागात आश्चर्यचकित झाले ;जेव्हा एका स्पर्धकाने त्यांना रात्री उशिरा सोशल मीडिया वापरू नका असे सांगितले. बिग बी, नियमितपणे सोशल मिडीयावर वेळ घालवत असतात, विशेषतः ट्विटर आणि त्यांच्या ब्लॉगवर रात्री उशिरा सक्रिय असतात.
मंगळवारी प्रसारित झालेल्या एपिसोडदरम्यान धीमाही त्रिवेदी हॉट सीटवर होती. जेव्हा धीमाने टेबल टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा बिग बींनी खेळ आणि अभ्यास दोन्ही गोष्टी ती कशा मॅनेज करते? हे विचारलं.
अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना स्पर्धक धीमा म्हणाली “मी फक्त माझ्या संपूर्ण दिवसाची 30 मिनिटे सोशल मीडियावर देते आणि माझ्या कुटुंबाला विश्रांती देते,” , ती पुढे म्हणाली की एखादी व्यक्ती त्यांना आवडलेल्या गोष्टीसाठी वेळ काढते. पण बिग बींच्या प्रश्नानंतर धीमानेही त्यांना विचारले की ते सोशल मीडिया मॅनेजमेंट कसे करतात?
“मी अनेकदा तुम्हाला पहाटे 2 वाजता पोस्ट करताना पाहते. तुम्ही इतके जास्त तास जागे राहू नका नाहीतर तुमच्यावर काळी वर्तुळे येतील,” धीमाही म्हणाली, “मी काही चुकीचे करत आहे का?” बच्चनजींनी आश्चर्यचकितपणे विचारले. त्यावर तिने उत्तर दिले, “नाही. पण तुम्ही तुमचीही काळजी घेतली पाहिजे.”
80 वर्षीय अमिताभ बच्चन यांनी सांगितले की तो दररोज सोशल मीडियासाठी वेळ काढतो, दररोज ब्लॉग लिहितो. जर त्याची एखादी पोस्ट केली नाही तर त्यांचे चाहते त्यांना लिहिण्याची आठवण करुन देतात.
बच्चन म्हणाले की हे माध्यम त्यांना लोकांशी “कनेक्ट” राहण्यास मदत करते आणि त्यानंतर एखाद्याने कधीही ट्रोल्सची भीती बाळगू नये आणि जे आवडते ते करावे.
वर्क फ्रंटवर, अमिताभ बच्चन त्यांचा अभिनेता मुलगा अभिषेक बच्चनच्या घूमर या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहेत . आर बाल्की दिग्दर्शित आणि सहअभिनेत्री सैयामी खेर असलेला हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.