Avatar The way of water Dainik Gomantak
मनोरंजन

Avatar 2 : अवतार 2 मध्ये 73 वर्षांच्या अभिनेत्रीने केला 14 वर्षांच्या मुलीचा रोल..

जेम्स कॅमेरुनच्या अवतार 2 या चित्रपटात एका 73 वर्षाच्या अभिनेत्रीने 14 वर्षाच्या मुलीचा अभिनय केला आहे.

Rahul sadolikar

दिग्दर्शक जेम्स कॅमेरुनच्या अवतार 2 या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच मोहिनी घातली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 3 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 2009 साली आलेल्या अवतार या चित्रपटाचाच हा सिक्वेल असुन कमाईचा आकडा बघता भारतातही या चित्रपटाला चांगले यश मिळालेले दिसते.

या चित्रपटाची एक रंजक गोष्ट समोर आली आहे. या चित्रपटात 14 वर्षाच्या मुलीचे एक पात्र आहे. पण प्रत्यक्षात हे पात्र 73 वर्षांच्या एका आजीने साकारले आहे.अभिनेत्री सिगोर्नी वीवर यांनी हे पात्र साकारलं आहे.

दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी यासाठी एका 73 वर्षीय अभिनेत्रीची निवड का केली? चला पाहुया. अवतार 2 मध्ये जॅक आणि नेतीरी या दाम्पत्याला चार मुलं आहेत. यापैकी तीन त्यांची स्वत:ची मुलं आहेत तर किरी नावाची एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे. याच मुलीचं पात्र 73 वर्षीय अभिनेत्री सिगोर्नी वीवर यांनी साकारले आहे.

अवतार चित्रपट ज्या तंत्रज्ञानाचा वापर करुन शुट केला आहे त्या तंत्रज्ञानाला परफॉर्मन्स कॅप्चर असं म्हटलं जातं.यात इमोशन कॅप्चर होतातच पण त्याचबरोबर चेहऱ्याचे हावभावही व्यक्त होतात ;आणि त्यामुळेच दिग्दर्शक जेम्स कॅमेरुनला अशा कलाकाराची गरज होती जी 14 वर्षाच्या मुलीचे हावभाव योग्य पद्धतीने दाखवु शकेल आणि मग अभिनेत्री सिगोर्नी वीवर यांच्या रुपाने हा शोध पुर्ण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT