Johnny Depp-Amber heard : मी पती जॉनी डेपशी तडजोड करायला तयार ! मानहानी प्रकरणात अ‍ॅंबर हर्डने घेतली माघार पण..

हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅंबर हर्डने पती अभिनेता जॉनी डेपशी तडजोड करायला तयार असल्याचे सांगितले
Johnny Depp-Amber heard
Johnny Depp-Amber heard Dainik Gomantak
Published on
Updated on

हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅंबर हर्ड आणि हॉलिवूडचा सुपरस्टार जॉनी डेप यांच्यात सुरू असलेला कायदेशीर संघर्ष आता नवा राहिला नाही. गेले कित्येक काळ हा संघर्ष सुरू आहे. शेवटी आज या खटल्यात अ‍ॅंबर हर्डने आपला पती जॉनी डेपशी तडजोड करण्यासाठी सहमती दर्शवली आहे.

सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅंबर हर्डने आपला पती हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेपच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. त्याविरोधात जॉनी डेपने अ‍ॅंबर हर्डच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.

या खटल्याचा निकाल समोर आला होता. त्यात कोर्टाने जॉनी डेपच्या बाजूने निकाल दिला होता. याशिवाय कोर्टाच्या निर्णयानुसार जॉनीवर खोटे आरोप केल्याबद्दल अ‍ॅंबर हर्डला १.५ कोटी अमेरिकी डॉलरची नुकसानभरपाई जॉनीला द्यावी लागणार होती. पण यानंतरही दोघांनीही यात तडजोड केली नव्हती . पण दोघांमध्ये याबाबतीत सहमती होऊ शकली नव्हती.

पण आता मात्र अँबरने या मानहानी प्रकरणात तडजोड करण्याचा निर्णय घेतला आहे.तीने एक पोस्ट शेअर करत तिने आधी तडजोडीचा निर्णय का घेतला नव्हता, याबद्दल सांगितलंय.

Johnny Depp-Amber heard
The Kashmir Files : 'कश्मिर फाईल्स'ला कचरा म्हणताच पेटुन उठले विवेक अग्निहोत्री, दिलं चोख प्रत्युत्तर..

आपण आता यापुढे कायदेशीर लढाई लढू शकणार नसल्याचं सांगत एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आपण हा निर्णय का घेतला याबद्दल सांगितले आहे. या पोस्टमध्ये अ‍ॅंबर म्हणते

" अमेरिकेच्या कायदेशीर व्यवस्थेवरचा विश्वास उडल्यानंतर मी हा निर्णय घेत आहे.मला तडजोड करायची नव्हती, जे सांगितले ते सत्य होते पण ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला.ज्या महिला अशा पद्धतीने समोर येऊन बोलण्याचं धाडस करतात त्यांना सोशल मिडीयावर बदनाम केलं जातं''

थोडक्यात आता या प्रकरणाचा शेवट होईल असं वाटतंय. गेले काळ हा कायदेशीर लढा सुरू होता त्याला आता ब्रेक लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com