मनोरंजन

गदर 2 पाहिल्यानंतर हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देताच तरुणाची हत्या...

गदर चित्रपट पाहताना अचानक हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देताच एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Rahul sadolikar

30 years youth killed by friends after shouting Hindustan zindabad : गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर गदर 2 ची जादू चालली आहे. पण एका घटनेने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे.

छत्तीसगडमधील भिलाई येथे मोबाईलवर गदर-2 चित्रपट पाहत असताना हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने मलकित सिंग उर्फ ​​वीरू (30) याची त्याच्या मित्रांनी शुक्रवारी रात्री हत्या केली. 

पोलिसांनी तसव्वुरफैजल, शुभम लहरे उर्फ ​​बबलू आणि तरुण निषाद या चार आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. मलकितचे वडील कुलवंत सिंग हे खुर्सीपार गुरुद्वाराचे प्रमुख आहेत

गदर 2 पाहिला आणि

मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील भिलाई येथे मोबाईलवर गदर-2 चित्रपट पाहत असताना हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने मलकित सिंग उर्फ ​​वीरू (30) याची त्याच्या मित्रांनी शुक्रवारी रात्री हत्या केली. 

पोलिसांनी तासव्वूर, फैजल, शुभम लहरे उर्फ ​​बबलू आणि तरुण निषाद या चार आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. मलकितचे वडील कुलवंत सिंग हे खुर्सीपार गुरुद्वाराचे प्रमुख आहेत

हत्येनंतर मोठा वाद

हत्येची माहिती मिळताच मलकितच्या नातेवाईकांसह शीख समाजातील सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी खुर्सीपार पोलीस ठाणे गाठले. यानंतर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. 

त्यांनी मलकितच्या पत्नीला 50 लाख रुपये नुकसानभरपाई आणि सरकारी नोकरीची मागणी केली आहे.

 पोलिसांनी सांगितले की, मलकितने हिंदुस्थान झिंदाबादचा नारा दिला तेव्हा दोन्ही मुस्लिम तरुणांना वाटले की तो त्यांना छेडण्यासाठी असे करत आहे.

हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा अन् हत्या

हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा देताच मलकितच्या मित्रांनी त्याला बेदम मारहाण केली. रात्री उशिरा त्यांना जखमी अवस्थेत रायपूर येथील रामकृष्ण केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.

 या घटनेबाबत दुर्गचे एसपी शलभ सिन्हा म्हणाले की, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकजण फरार आहे. परस्पर वादातून ही घटना घडली अशीही माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT