Oscar 2023 Dainik Gomantak
मनोरंजन

Oscar 2024 : महाप्रलयाची गोष्ट सांगणारा मल्याळम चित्रपट '2018' ऑस्करच्या शर्यतीत...

Rahul sadolikar

गेल्या काही दिवसांपासुन भारतातल्या चित्रपटांच्या ऑस्करवारीची चर्चा सुरु होती. वेगवेगळ्या भाषेतले अनेक चित्रपट यानिमित्ताने चर्चेत होते.

आता मात्र ऑस्करची ही चर्चा संपली असुन या स्पर्धेत मल्याळम चित्रपट 2018 ने बाजी मारली आहे. चला पाहुया सविस्तर वृत्त.

2018 या मल्याळम चित्रपटाची ऑस्कर 2024 साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.

हा चित्रपट '2018 एव्हरीवन इज अ हिरो' च्या केरळमधल्या पुराच्या नैसर्गिक अरिष्टावर आधारित एक ड्रामा आहे.

ज्युड अँथनी जोसेफ दिग्दर्शित या चित्रपटात टोविनो थॉमस, कुंचाको बोबन, आसिफ अली, विनीत श्रीनिवासन, नारायण आणि लाल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

2023 याच व वर्षी मे महिन्यात रिलीज झालेल्या '2018' या मल्याळम चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाने ऑस्करसाठी मोठी झेप घेतली आहे.

या चित्रपटाने आता थेट ऑस्करमध्ये मजल मारली आहे. '2018' या मल्याळम चित्रपटाला ऑस्कर 2024 साठी भारताकडून अधिकृत एंट्री देण्यात आली आहे.

केवळ 12 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये '2018' या चित्रपटाची निर्मीती करण्यात आली होती. 5 मे रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट ठरला आहे.

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. सुरवातीला मल्याळम आणि नंतर हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये हा सिनेमा रीलीज करण्यात आला.

'2018 एव्हरीवन इज अ हिरो' ची गोष्ट मोठ्या नैसर्गिक अरिष्ठाची आहे. सांगायचं तर हा चित्रपट 2018 साली आलेल्या केरळ पुरावर आधारित आहे.

पुरासारख्या समस्येवर मात करणाऱ्या लोकांची गोष्ट या चित्रपटात उत्तमरीत्या दाखवण्यात आली आहे.

2018 मध्ये आलेल्या केरळच्या महापुराने राज्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT