Bollywood Box Office Report Dainik Gomantak
मनोरंजन

Bollywood Box Office Report: 12 वी फेल समोर कंगनाचा तेजस भुईसपाट...गणपत, लिओ ची इतकी कमाई

Bollywood Box Office Report: 12 वी फेल, तेजस, लिओ आणि गणपत या चित्रपटांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट चला पाहुया.

Rahul sadolikar

Bollywood Box Office Report: गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौतचा तेजस हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला होता. एका लढावू पायलटच्या वेषातली कंगना तिच्या चाहत्यांना चांगलीच भावली होती.

अनेक चाहत्यांनी कंगनाच्या या चित्रपटाला उचलून धरले होते ;पण कंगनाचा तेजस रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर मात्र फारशी कमाल दाखवू शकला नाही.

या चित्रपटाला आता विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित '12 वी फेल' या चित्रपटाने मागे टाकले आहे. चला पाहुया बॉक्स ऑफिसवर सध्या काय सुरुय.

बॉक्स ऑफिस रिपोर्ट

सध्या बॉक्स ऑफिसवर साऊथ आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये टक्कर सुरू आहे. या टक्करमध्ये साऊथच्या चित्रपटांचा दबदबा पाहायला मिळत आहे. एकीकडे सुपरस्टार थलपती विजयच्या 'लिओ' चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 264.25 कोटींची कमाई केली होती. 

दुसरीकडे, शुक्रवारी प्रदर्शित झालेला कंगना राणौतचा 'तेजस' अवघ्या चार दिवसांत अपयशी ठरला असून विधू विनोद चोप्राच्या '12वी फेल' या चित्रपटाचीही अवस्था बिकट आहे. मात्र, आता 'लिओ' आणि 'टायगर नागेश्वर राव'चा वेगही मंदावला आहे. चला जाणून घेऊया सोमवारी कणत्या चित्रपटाची कामगिरी कशी झाली... 

तेजस

कंगनाचा तेजस या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. भारतीय वायुसेनेच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाकडून कंगना आणि लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या, पण 'तेजस' त्यांना पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. 

पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने खराब प्रदर्शन केले आहे, ज्याचा परिणाम म्हणून कंगनाने स्वतः प्रेक्षकांना थिएटरमध्ये 'तेजस' पाहण्याचे आवाहन केले. 

मात्र, याचाही काही परिणाम झाला नाही आणि अवघ्या चार दिवसांत चित्रपटाचे कलेक्शन लाखांवर पोहोचले. सोमवारच्या चाचणीत सपशेल अपयशी ठरलेल्या 'तेजस'ने केवळ 50 लाख रुपये जमा केले, त्यानंतर त्याचा एकूण व्यवसाय 4.25 कोटी रुपये झाला आहे.

लिओ

साऊथचा सुपरस्टार दलपती विजय आणि संजय दत्तचा अॅक्शन एंटरटेनर 'लिओ'ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती.

लोकेश कनगराज दिग्दर्शित 'लिओ'ने पहिल्या आठवड्यात भरघोस कमाई करून 'जेलर' आणि 'गदर 2' सारख्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते, मात्र आता दुसऱ्या आठवड्यात त्याच्या कलेक्शनमध्येही घट झाली आहे.

या चित्रपटाने 12 व्या दिवशी 4.5 कोटी रुपये कमावले आणि त्याचा एकूण व्यवसाय 307.95 कोटी रुपये झाला.

गणपत

टायगर श्रॉफ, क्रिती सॅनन आणि अमिताभ बच्चन स्टारर 'गणपत' या वर्षातील फ्लॉप चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.

 पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्कंठा लागून राहिली असून आता दुसऱ्या आठवड्यात ‘गणपत’च्या कमाईत सातत्याने घट होत असल्याची परिस्थिती आहे.

 पहिल्या आठवड्यात  11.8 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने दुसऱ्या सोमवारी केवळ 10 लाखांचा व्यवसाय केला. 'गणपत'चे एकूण कलेक्शन 12.40 कोटींवर पोहोचले आहे.

12 वी फेल

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12वी फेल' या चित्रपटाला समीक्षक आणि मोठ्या स्टार्सकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. 

तीन वर्षांनंतर या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करणाऱ्या विधू विनोद चोप्राने आपली दमदार कलाकृती दाखवली आहे. पण तरीही हा विक्रांत मॅसी स्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हळूहळू प्रगती करत आहे.

 वीकेंडच्या वाढीनंतर सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा घसरण झाली. '12वी फेल'ने चौथ्या दिवशी 1.20 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर तो 7.84 कोटींवर पोहोचला आहे.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT