bjp.jpg 
महाराष्ट्र

Maharashtra: आमचे पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच... शिवसेनेची भाजपवर जहरी टीका

Maharashtra: चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीसनिष्ठ आहेत. त्यामुळे ते फडणवीसांच्या मंजुरीशिवाय ते कसकाय मुख्यमंत्रीपदाबाबत बोलू शकतील, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे .

दैनिक गोमन्तक

Maharashtra: महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या कारणांवरुन वाद सुरु आहेत. त्याचबरोबर, जेव्हापासून शिवसेना ठाकरे आणि शिंदे अशा दोन गटात विभागली गेली आहे ,तेव्हापासून आरोप प्रत्यारोप वाढताना दिसत आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनात सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर जारदार चर्चा झाली.

दरम्यान, अधिवेशनाच्या आधी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावर आधारित आता शिवसेनेने टीका केली आहे. आमचे पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच अर्थात देंवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnvis ) हेच आमचे मुख्यमंत्री असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर शिवसेनेने म्हटले आहे की भाजपचे लोक सरकार आणि शिंदे यांच्या बाजूने लढत असल्याचं दाखवत आहेत, पण ते केवळ आव आणत आहेत. त्याचबरोबर, चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीसनिष्ठ आहेत. त्यामुळे ते फडणवीसांच्या मंजुरीशिवाय ते कसकाय मुख्यमंत्रीपदाबाबत बोलू शकतील, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे . शिंदे गटाचा वापर करुन भाजप सत्ता करु इच्छीत आहे. फेब्रुवारीपर्यत खूप गोष्टी बदलतील असेही शिवसेनेनेही सामनाच्या मुखपत्रात भाजप ( BJP ) वर टीका करताना म्हटले आहे .

काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकार फेब्रुवारी महिला पाहू शकणार नाही, असं म्हटलं होतं. आता हे भाकित खरे होणार का , शिंदे गट आणि भाजपचे युतीचे सरकार टिकणार की पडणार हे पाहणए महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

Supreme Court: स्वतःच्या इच्छेनं देहव्यापार करणं गुन्हा नाही! वेश्याव्यवसायावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काय नेमकं प्रकरण?

Goa land Zoning: 17 गावांतील सुमारे 2.01 कोटी चौरस मीटर जमीन 'NDZ'मध्‍ये; सूचना, हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत; टीसीपीचा निर्णय

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

Goa Comunidade land: जमीन घोटाळा प्रकरणी सावंत गावकर आक्रमक; सर्वण कोमुनिदादची जमीन, गावकऱ्यांनी अखेर उभारला फलक

SCROLL FOR NEXT