Minister Yashomati Thakur Dainik Gomantak
महाराष्ट्र

काँग्रेसला वगळून मोदी विरोधातली लढाई यशस्वी नाही; यशोमती ठाकूर

आज देशात बदलाचे जे काही वारे वाहत आहेत तसेच विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळत आहे ती काँग्रेसमुळेच आहे असा टोला ही त्यांनी लगावला.

दैनिक गोमन्तक

केंद्रातील भाजप सरकारविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिल्यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची सुध्दा भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. मात्र त्यांनी काँग्रेसच्या एकाही मंत्र्याची किंवा नेत्याची भेट घेतली नाही. त्यामुळे विवीध चर्चेला उधान आले आहे. त्यामुळे काँग्रेसची या भेटीवर नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं. विशेष म्हणजे काँग्रेसने स्वत:हून पुढे येऊन या भेटीवर प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसला वगळून मोदीं विरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच आहे असा घणाघात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाजपला (BJP) केला. त्यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधतांना एक ट्विट केले आहे. त्यात यशोमती ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेसला (Congress) वगळून मोदीं विरोधातली लढाई ही यशस्वी होणार नाही. काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे 'संघी' अजेंड्या विरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे काही वारे वाहत आहेत तसेच विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळत आहे ती काँग्रेसमुळेच आहे असा टोला ही त्यांनी लगावला.

पंजाबनंतर आता उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकांमध्ये विजय मिऴवण्यासाठी भाजपने आपली ताकद पणाली लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सातत्याने काॅंग्रेसवर निशाणा साधत आहे. निवडणूक हरणारी कुटुंबे आता जातीच्या नावावर विष पसरवतील. हे लोक असे आहेत जे खुर्चीसाठी कुटुंबासोबत लढतील असा आरोपही मोदींनी केला आहे. याला प्रत्यूत्तर ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT