Pruthviraj Patil
Pruthviraj Patil Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोल्हापूरच्या 20 वर्षीय पृथ्वीराज पाटीलने पटकावले महाराष्ट्र केसरी विजेतेपद

दैनिक गोमन्तक

कोल्हापूरच्या 20 वर्षीय पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरचा पराभव करून महाराष्ट्र केसरी-2022 चे विजेतेपद पटकावले. 64व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीचे सामने सातारा येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडले. कोल्हापुरी पैलवानाने तब्बल 21 वर्षांनंतर ही कुस्ती जिंकली आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकरचा 5 - 4 असा पराभव करत महाराष्ट्र (Maharashtra) केसरी विजेतेपद पटकावले. (Wrestler from Kolhapur Pruthviraj Patil wins Maharashtra Kesari title)

पृथ्वीराज बाबासाहेब पाटील हा मूळचा कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावचे रहिवासी आहे. शिंगणापूर येथील शाहू कुस्ती केंद्र व कोल्हापूर शहरातील मोतीबाग तालीम येथून त्याने कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. प्रसिद्ध ‘हिंद केसरी’ पैलवान दादू चौगुले यांच्याकडून त्याने कुस्तीचे धडे घेतले. पाटीलने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 92 किलो वजनी गटात कांस्यपदकही पटकावले.

“काहीही झाले तरी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकायचीच असा पण मी केला होता. आपण ही कुस्ती जिंकणारचं असा सुरूवातीपासूनच मला विश्वास होता. त्यासाठी मी पूर्वीपासून तयारीही केली होती. सुरुवातीला प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेऊन शेवटी आक्रमक व्हायचे असे धोरण मी ठरवले होते. कुस्ती करत असताना मी जे ठरवले होते त्याप्रमाणे कुस्ती होत गेली आणि अंतिम क्षणी मी केलेली खेळी यशस्वी झाली व गुणाधिक्यावर मी जिंकलो,”

- पृथ्वीराज पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT