मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  Dainik Gomantak
महाराष्ट्र

World Malaria Day 2022: मलेरिया मुक्त महाराष्ट्र बनवु - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

यावर्षी मलेरिया दिनाची थीम, 'मलेरियाचे प्रमाण कमी करणे आणि लोकांचा जीव वाचवणे' अशी आहे.

दैनिक गोमन्तक

आज जगभरात 'जागतिक मलेरिया दिन' (World Malaria Day) म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आरोग्य संपन्न आणि मलेरिया मुक्त महाराष्ट्र (Maharashtra) बनवण्यासाठी आपण एकत्र येऊ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आवाहन केले आहे. नवकल्पना वापरून सर्वेक्षण आणि उपाययोजनांच्या माध्यमातून मलेरियापासून बचाव करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असे ते म्हणाले आहेत. (World Malaria Day latest News)

'जागतिक मलेरिया दिनानिमित्त सोशल मिडियावर ट्विट करत मलेरिया या आजारा विरोधात लढण्यासाठी आपण एकत्र येऊ असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 2008 मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा केला.

* यंदाची थीम
दरवर्षी जागतिक मलेरिया दिनाची थीम वेग-वेगळी असते. यावर्षी मलेरिया दिनाची थीम, 'मलेरियाचे प्रमाण कमी करणे आणि लोकांचा जीव वाचवणे' अशी आहे. मलेरिया (Malaria) आजार हा डासांमुळे पसरतो. प्लास्मोडियम व्हायवॅक्स नावाच्या विषाणूमुळे हा आजार होतो. हा आजार अॅनोफिलीस ही मादी डास चावल्यानं होतो. त्यानंतर हा विषाणू यकृत आणि रक्त पेशींमध्ये पसरतात. त्यामुळे लोक व्यक्ती आजारी पडतो.

* मलेरियाची लक्षण कोणती
* डास चावल्यानंतर आठ दिवसाने मलेरियाची लक्षण सुरू होतात.

* ताप येणे, थकवा, स्नायू दुखणे, डोके दुखी, चक्कर येणे ही मलेरियाची लक्षण आहेत.

* यामधील कोणतीही लक्षण जर तुम्हाला जाणवली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध घ्यावीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT