राणांविरोधात 'मातोश्री'बाहेर आजींचा पहारा; मुख्यमंत्री ठाकरे सहकुटुंब भेटीला

80 वर्षीय आजींनी शनिवारी राणा दाम्पत्याविरोधात 'मातोश्री'बाहेर तळपत्या उन्हात आंदोलन केले होते.
Maharashtra CM
Maharashtra CMDainik Gomantak
Published on
Updated on

बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना महत्वाची जागा दिली आहे. त्यांचा हाच वारसा त्यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जपला आहे. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्रातील अनेकजण निष्ठेने विश्वास ठेवतात. सध्या सगळीकडे गाजत असलेले हनुमान चालीसा आणि नमाज पठण या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. (CM Uddhav Thackeray met the Old Lady who was guarding outside Matoshri)

Maharashtra CM
UPI Server Down : ऑनलाईन आर्थिक व्यवहारात बाधा; युजर्स हैराण

या परिस्थितीत 80 वर्षीय आजींनी शनिवारी राणा दाम्पत्याविरोधात 'मातोश्री'बाहेर तळपत्या उन्हात आंदोलन केले होते. या दरम्यान त्यांनी पुष्पा या सुप्रसिद्ध चित्रपटातील 'मै झुकेगा नही साला' हा डायलॉग मारुन सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले होते. रविवारी सायंकाळी चंद्रभागा शिंदे या 80 वर्षीय शिवसैनिक आजींची मुख्यमंत्र्यांनी सहकुटूंब जाऊन भेट घेतली.

चंद्रभागा आजी या सगळ्या प्रकारामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. झुकेंगे नहीं म्हणत शिवसेनेच्या ‘फायर’ आज्जींचा रुद्र अवतार गेले दोन दिवस महाराष्ट्राने मातोश्रीबाहेर पाहिला आहे. आणि यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झाले होते. खुद्द मुख्यमंत्री घरी आल्याने आजी चंद्रभागा शिंदे यांच्या घरी सणासारखेच वातावरण होते. मुख्यमंत्र्यांनी आजींचे आशीर्वाद घेतले. बाळासाहेबांच्या कुटुंबियाचे पाय घराला लागले आणि मनाला आनंद झाला अशी प्रतिक्रिया यावेळी आजींनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com