Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

भाजप आणि शिवसेनेची मैत्री होणार का ? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलं उत्तर

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये बसलो आहे. तर सांगा आता यांना सोडून कुठे जाणार ?

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा चांगलीच रंगली आहे. पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या भेटीनंतर हा प्रश्न विचारण्यात येत आहे. राज्याचे दोन दिवसीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूव मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भाजपशी पुन्हा मैत्रीचे बंध जुळवण्यासंबंधी विचारले असता ते म्हणाले, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये बसलो आहे. तर सांगा आता यांना सोडून कुठे जाणार ? मुख्यमंत्री ठाकरे यांनीच प्रतिसवाल केल्याने परिषदेदरम्यान एकच हशा पिकला. त्यानंतर पुन्हा एकदा काही पत्रकारांनी तोच सवाल केला असता, अहो तीस वर्षांची आमची युती असताना काही घडले नाही तर आता काय नवं घडणार आहे, असं म्हणत ही युती होणार नसल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केले. काल विधानसभेमध्ये जे काही घडले ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजवणार आहे.

विधानसभेमधील विरोधकांचे वर्तन जिव्हारी लागणारे होते, असे ठाकरे यांनी म्हटले. अध्यक्षांचा राजदंड पळवून नेण्याचा प्रकार झाला. बाळासाहेब थोरात यांच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच असा धक्कादायक प्रकार घडला. मी प्रथम विधीमंडळामध्ये आलो आहे. उत्कृष्ट संसदपटू असा बहुमानही आपण सदस्यांना देत असतो. मात्र हल्ली जे काही सुरु आहे त्याने विधीमंडळाचा दर्जा चांगलाच खालावला आहे. जनतेची लोकप्रतिनिधींकडून काही अपेक्षा असतात. लोकांना चांगल्या बदलाची अपेक्षा असते. परंतु राज्यातील जबाबदार विरोधी पक्षाकडून अपेक्षित वर्तन घडताना दिसत नाही, अशा प्रकारचं सभागृहामध्ये वागणं अपेक्षित नाही, असही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT