महाराष्ट्र विधिमंडळाच्या(Maharashtra Assembly) दुसऱ्या दिवशीही प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला , 12 आमदारांच्या निलंबनावरून भाजपने(BJP) ठाकरे सरकारला घेरत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात भाजप विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा चालवत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackery) यांच्याकडे असलेल्या खात्यातच भ्रष्टाचार झाला असल्याची टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असणाऱ्या वनखात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मुख्यमंत्री महोदय तुमच्या नाकाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या यांच्या वन खातच बदल्यांसाठी रेट कार्ड ठरवून 5-10 लाख रुपये घेतात. मी मुख्यमंत्री ठाकरे पैसे घेतात असं म्हणत नाही पण त्याच्या खात्यात रेट कार्ड काम सुरू आहे, यावर कारवाई करणार का ? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थितीत केला आहे .
प्रकल्पाला नाव देतात पण काम मात्र शून्य करता . स्मार्ट सिटीला बाळासाहेब यांचे नाव दिले. त्यात काहीच काम झाले नाही. जनाची नाही तर मनाची ठेवा. आदिवासी कुठलेही मार्क नसलेले पदार्थ दिले जात आहे. यावर शासनाचे मोहर नाही, असे पदार्थ आदिवासींना देणे हा गुन्हा आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
याबरोबरच जे मुघल, इंग्रज यांना जमले नाही ते या सरकारने करून दाखवले आहे , वारकरी लोकांना अटक केली जात होती. सर्व जबाबदारी केंद्रावर ढकलली जाते मग राज्य सरकार काय भजी तळायला ठेवलं का? वसुलीच काम प्रत्येक काम सुरू खात्यात, प्रत्येक खात्यात वाझे आहे, असे म्हणत सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.