नुकतीच संभाजीराजे छत्रपती यांनी पुणे येथे पत्रकार घेत महत्त्वाच्या दोन घोषणा केल्या आहेत. संभाजी राजे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला आहे. त्यामूळे संभाजीराजे छत्रपती नेमकी काय भुमिका घेणार याबाबत गेले काही दिवस राजकिय वर्तूळात चर्चा सुरु होत्या. ते याबाबत नेमकी काय भुमिका घेणार याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. यावर संभाजीराजे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
या बैठकिवेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभेची निवडणूक लढवणार आहे. तसेच स्वराज्य नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ही संटना काढण्यामागचा हेतू हा केवळ आणि केवळ शिवाजी महाराज आणि शाहू महाजारांचे विचार राज्यातील सर्वांपर्यंत पोहोचवणे हा आहे. असं त्यांनी सांगितलं
अद्याप छत्रपती संघटनेचा चिन्हं, रंग ठरवला नसला तरी हृदयात छत्रपती आहेत. यासाठी आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल. यासाठी प्रयत्न करणार आहे. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे असं त्यांनी सांगितलं. सद्या राजकारण विरहित राजा नागरिकांना हवा आहे. आपली ताकद 'स्वराज्य'मार्फत सगळीकडे पोहोचवायची आहे, ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यासाठी माझी तयारी आहे असं ही त्यांनी सांगितलं.
तसेच आता आपण राज्यातील सगळ्या आमदारांना भेटणार आहे. तसेच वेळप्रसंगी मी लोकसभा सुद्धा लढवू शकतो. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला राज्यसभेचा राष्ट्रपती नियुक्त सभासद होण्याची विनंती केली. 2016 मध्ये मी राज्यसभेचा खासदार झालो. त्याबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले.
कित्येक वर्षे महाराष्ट्रातील लोकांनी छत्रपती घरण्यावर प्रेम केलं. या प्रेमापोटी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. गोंदिया वगळता सर्व जिल्हे फिरलो. मराठा समाजाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न मी जाणून घेऊ शकलो. या आठवणी ही जागवत आपल्या समाजकार्याचे पुन:स्मरण त्यांनी उपस्थितांना करुन दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.