Fraud
Fraud  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai: उद्योगपतीच्या पत्नीचा उद्योग! पतीला मुठीत ठेवण्यासाठी ज्योतिषाला दिले 60 लाख रूपये

गोमन्तक डिजिटल टीम

उद्योगपती नवऱ्याला आपल्या मुठीत ठेवण्यासाठी त्याच्या पत्नीने एका ज्योतिषाला 59 लाख रूपये दिल्याची घटना समोर आली आहे. काळा जादूच्या मदतीने पतीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा पत्नीचा डाव होता. मुंबईतील अंधेरी येथे ही घटना घडली असून, पोलिसांनी ज्योतिषाला आणि त्याच्या साथिदाराला अटक केली आहे.

(Wife pays Rs 60 lakh to astrologer to get 'total control' over husband)

अंधेरीचा रहिवासी असलेला 39 उद्योगपती अंधेरी एमआयडीसीत कंपनी आहे. या व्यक्तीला पत्नीसह दोन मुले आहेत. मात्र या महिलेचे 13 वर्षापूर्वी एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबध होते. दरम्यान, हे प्रकरण परस्पर विचारांनी सोडविण्यात आले होते. असे तक्रारदार उद्योगपतीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

उद्योगपतीने आपल्या कामगारांना दिवाळी बोनस देण्यासाठी घरात 35 लाख रूपये ठेवले होते. आपल्या पत्नीला देखील याबाबत माहिती दिली होती. दरम्यान, 18 ऑक्टोबर रोजी घरातील पैसे गायब झाल्याचे उद्योगपतीच्या लक्षात आले. त्याने याबाबत आपल्या पत्नीला विचारले असता तिने समाधानकारक उत्तेर दिली नाहीत. त्यानंतर त्याने आपल्या भावांना फोन करून याबाबत विचारले.

दरम्यान, पत्नीने आपणचे हे पैसे एका ज्योतिषाला दिले असल्याचे कबुली दिली. पतीसोबत होणाऱ्या सततचे भांडण आणि त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण मिळावे या उद्देशाने हे पैसे दिल्याचे या महिलेने कबुली दिली. विशेष म्हणजे ही महिला इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून या ज्योतिषाला भेटली. त्यात तिचा बॉयफ्रेन्डने मध्यस्थी करून काळा जादूच्या मदतीने नवऱ्याला वश करण्याचा डाव ठरला होता. चौकशी नंतर महिलेने केवळ पैसेच नव्हे तर दागिने देखील या ज्योतिषाला दिले होते. रोख रक्कम आणि दागिने मिळून 59 लाख रूपये दिल्याचे उघड झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT