Supreme Court Danik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Municipal Corporation Election Hearing: महापालिका निवडणुकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Municipal Corporation Election Hearing: महापालिका निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमन्तक

आज सर्वोच्च न्यायालयात महापालिका निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने केलेले प्रभाग रचनेतले बदल, थेट नगराध्यक्षपदाची निवड या मुद्द्यांना कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे याचा निर्णय झाल्यानंतरच महापालिका निवडणुकांचे बिगुल कधी होणार याची स्पष्टता येणार आहे.

मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक महापालिकांवर सध्या प्रशासकाची नियुक्ती आहे. सहा महिन्यांची मुदतही ओलांडून गेली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्राथमिकतेबद्दल आज सुप्रीम कोर्टात काही युक्तिवाद अथवा टिप्पणी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचे असणार आहे. राज्य सरकारने दोन आठवडे वेळ मागितली होता. राज्य सरकारला वेळ वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यामुळे शिंदे (Eknath Shinde) सरकारला दिलासा मिळाला होता. त्यानंतर आज दोन आठवड्यानंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

मुंबईसह 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्या, 207 नगरपालिका, 13 नगरपंचायती निवडणुकांची प्रक्रिया प्रक्रिया संदर्भातील याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.

  • सत्तांतर झाले आणि निवडणुका लांबणीवर पडल्या

मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची सूचना केली होती. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. शिंदे-फडणवीस सरकारने वॉर्ड रचना पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सदस्यीय प्रभाग आणि इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग केला होता. त्यानंतर शिंदे सरकारने 2017 प्रमाणे चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला होता. त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर 28 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, राज्य सरकारने दोन आठवड्यांची मुदत मागितल्यामुळे सुनावणी पुन्हा लांबवणीवर गेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT