प्रकाश आंबेडकर Dainik Gomantak
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांना कोणता दिला मोलाचा सल्ला?

केंद्रीय यंत्रणेकडून धाडीबाबतची (Raid) माहिती आणि त्याबाबतची कायदेशीर कारवाई (Legal action) निश्चित वेळेमध्ये न्याय यंत्रणा (judiciary) आणि जनतेसमोर (people) द्यायला हवी,

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर आजारपणामुळे पक्षाच्या दैनंदिन कामातून त्यांनी तीन महिने विश्रांती घेतली होती.

आता या विश्रांतीनंतर ते पुन्हा राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मोलाचे सल्ले दिले.

नवाब मालिकांचे जावई समीर खान एनसीबीच्या (NCB) विरोधात फौजदारी गुन्हा (Crime) नोंदवत नाहीत. यामुळे केंद्रीय एजन्सीमार्फत सुरू धाडसत्र सुरु आहे. कोणावर डाग आहेत आणि कोण धुतल्या तांदळासारखे आहे हे समजेना झालंय.

त्याचबरोबर केंद्रीय एजन्सीकडून (central agency) महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी संबंधित असलेल्या नातेवाईकांवर धाडी टाकत आहे. यांचे हे धाडसत्र सुरू आहे. मात्र यामध्ये अनेक धाडी या निष्कर्षापर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे हे धाडसत्र राजकीय कुरघोडीने सुरु आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे, असे आंबेडकर म्हणाले.

फडणवीसांनी पुरावे सादर करावे:

राज्यातील मंत्र्यांकडे (Ministers) वसुलीचे सॉफ्टवेअर आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर केवळ आरोप करण्यापेक्षा फडणवीस यांनी याबाबत जर काही पुरावे असतील ते सादर करावे, असे आव्हान प्रकाश आंबेडकरांनी केले. तसेच त्यांनी सादर केलेले आकडे कुठून आले? या संदर्भातही काहीच पुरावे त्यांनी दिले नाही, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.

राजकारणात (Politics) लोकांची दिशाभूल करण्यासाठी कुणीही असे पुरावे नसणारे आरोप करू नये. कारण काही दिवसांनी अशा या आरोपांना नागरिक करमणूक म्हणून पाहतील. याला ते गांभीर्याने घेणार नाहीत, असा बोचरा सल्ला आंबेडकर यांनी फडणवीसांना दिला.

केंद्रीय यंत्रणेकडून धाडीबाबतची माहिती आणि त्याबाबतची कायदेशीर कारवाई निश्चित वेळेमध्ये न्याय यंत्रणा आणि जनतेसमोर द्यायला हवी, अशी अपेक्षा आंबेडकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT